आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रिलीज झाला सूरज आणि अथिया स्टारर 'हीरो'चा TRAILER

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सलमान खान प्रॉडक्शनच्या आगामी 'हीरो' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाद्वारे अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली आणि अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी बी टाऊनमध्ये पदार्पण करत आहे. सलमान खानने ट्विट करुन सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलरमध्ये सूरज आणि अथियाची रोमँटिक केमिस्ट्रीसोबतच अॅक्शनचा तडका बघायला मिळतोय.
1983 मध्ये रिलीज झालेल्या सुभाष घईंच्या 'हीरो' या सिनेमाचा हा रिमेक आहे. सूरज आणि अथिया स्टारर हा सिनेमा निखिल आडवाणी यांनी दिग्दर्शित केला आहे. तर सलमान खान याचा निर्माता आहे. सिनेमात गोविंदा, विनोद खन्ना आणि अनिता हसनंदानी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 11 सप्टेंबर रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा, 'हीरो'च्या ट्रेलरची खास झलक...