आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidhu Vinod Chopra To Direct New Movie, May Cast Amitabh Bachchan

विधू दिग्दर्शित करणार '50वीं सालगिरह’; सिनेमात असतील अमिताभ बच्चन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः विधू विनोद चोप्रा आणि अमिताभ बच्चन)

1976 पासून ते आत्तापर्यंत विधू विनोद चोप्रा यांनी दोन लघुपटांसोबत सात सिनेमे (सजा-ए-मौत, खामोश, परिंदा, 1942-ए लव स्टोरी, करीब, मिशन कश्मीर, एकलव्य) दिग्दर्शित केले आहेत. 2007मध्ये रिलीज झालेला एकलव्य द रॉयल गार्ड हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा सिनेमा होता.
आता तब्बल सात ते आठ वर्षानंतर विधू विनोद चोप्रा एक सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. याविषयी त्यांनी सांगितले, "सिनेमाच्या पटकथेवर काम सुरु आहे. शीर्षक असेल '50 वीं सालगिरह'. गेल्या चार वर्षांपासून पटकथेवर काम करतोय. अद्याप आणखी काही वेळ लागेल."
पटकथेसाठी चार वर्षे का लागलीत, असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, ''चांगल्या कामासाठी जास्त वेळ लागतो. एका कथेवर सतत काम सुरु असते. अंतिम स्वरुप देण्यासाठी त्याला वेळ देणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया खूप साधी आहे. तुम्ही जेवढ्या वेळा कथा वाचाल, तेवढी त्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते.''
या सिनेमातील स्टारकास्टविषयी अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमात अमिताभ बच्चन असण्याची शक्यता आहे. यापूर्वी 'एकलव्य'मध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते.