बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिने अलीकडेच आई सरस्वती बालन, बहीण प्रिया बालन आणि भाच्यांसोबत दुर्गा मातेचे दर्शन घेतले. यावेळी विद्याने बंगाली पद्धतीने साडी परिधान केली होती.
मुंबईतील जुहू येथील एका दुर्गा पंडालमध्ये ती आपल्या कुटुंबीयांसोबत पोहोचली होती. दुर्गा पुजेविषयीच्या आठवणींना उजाळा देताना विद्या म्हणाली, ''ब-याच वर्षांनी मुंबईत मी दुर्गा पुजेत सहभागी झाले. दुर्गा पुजेविषयीची एक मोठी आठवण म्हणजे नवरात्रीच्या काळातच आम्ही कोलकाता येथे 'कहानी' या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात केली होती.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, दुर्गा पंडालमध्ये क्लिक झालेली विद्याची खास छायाचित्रे...