आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोस्ट वॉण्टेड विद्या बालनला पाहिलंय का तुम्ही? बघा 'कहानी-2'चा जबरदस्त Trailer

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : अभिनेत्री विद्या बालनच्या ‘कहानी 2 : दुर्गा रानी सिंह’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये विद्या बालन अतिशय दमदार दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचेे पोस्टर रिलीज करण्यात आलेे होतेे. हा सिनेमा 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कहानी'चा सिक्वेल आहे. ‘कहानी’मध्ये विद्याने तिच्या पतीच्या मृत्यूचा बदला घेतला होता. तर ‘कहानी 2 : दुर्गा रानी सिंह’मध्ये ती मुलीसाठी झगडताना दिसत आहे. या सिनेमा विद्या ‘वॉण्टेड क्रिमिनल’च्या भूमिकेत दिसणार आहे.
अपहरण आणि हत्याच्या आरोपात पोलिस विद्याच्या मागावर आहेत. सुजॉय घोष दिग्दर्शित या सिनेमात विद्यासह अर्जुन रामपाल आणि जुगल हंसराज प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाचा ट्रेलर उत्तम आहे. विद्याचा अभिनय जबरदस्त आहे. 'कहानी 2' हा ‘कहानी’प्रमाणेच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, असेे ट्रेलरवरुन वाटत आहे. हा सिनेमा 2 डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, 'कहानी 2'चा ट्रेलर आणि काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...