आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यदर्शनाला पोहोचली होती विनोद खन्नांची पहिली पत्नी, बिग बींसह या कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप द्यायला पोहोचलेले कलाकार... - Divya Marathi
विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप द्यायला पोहोचलेले कलाकार...
ज्येष्ठ अभिनेते, खासदार विनोद खन्ना पंचत्वात विलीन झाले आहेत. विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर मुंबईतील वरळी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  ते 70 वर्षांचे होते. वर्षभरापासून कॅन्सरशी त्यांची झुंज सुरू होती. गेल्या काही दिवसांत त्यांची तब्येत अत्यंत खालावली होती. गिरगाव येथील एचएन रिलायन्स फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्कारात त्यांच्या दोन्ही पत्नी गितांजली आणि कविता यांच्यासह मुले अक्षय खन्ना, राहुल खन्ना, साक्षी खन्ना आणि मुलगी श्रद्धा उपस्थित होते. अमिताभ बच्चन, रणधीर कपूर, ऋषी कपूर, सुभाष घई, रणदीप हुड्डा, अभिषेक बच्चन, दीया मिर्झा, रणजीत, उदीत नारायण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल या दिग्गजांनी विनोद खन्ना यांचे अंत्यदर्शन घेतले. 
 
हेही वाचा...

असाही योगायोग, जीवलग मित्राच्या मृत्यूदिनीच घेतला अखेरचा श्वास..
'इज्जत वो दौलत हे जो एक बार चली गयी तो...' हे आहेत विनोद खन्ना यांचे 13 दमदार Dialogues..

बातम्या आणखी आहेत...