आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Waiting For The Right Film Script: Madhuri Dixit

‘डेढ इश्किया’नंतर दर्जेदार कथा मिळाली नसल्याची अभिनेत्री माधुरी दीक्षितची खंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चांगली कथा मिळाल्यास लवकरच चित्रपट करीन, असे अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले.

माधुरी म्हणाली, अभिनय हे माझे पहिले प्रेम आहे. गेल्या काही दिवसांत मला चित्रपटासाठी विचारणा झाली. मात्र, चांगल्या कथा नसल्याने मी ते चित्रपट नाकारले. चांगली कथा मिळाल्यास चित्रपट करीन. सध्या मी छोट्या पडद्यावरील डान्स शोच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याचे तिने सांगितले. अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर सध्या कुटुंबाला प्राधान्य देणे आपल्यासाठी आवश्यक आहे. सर्वांची काही तरी स्वप्ने असतात. त्याप्रमाणे कुटुंब आणि मुले माझे स्वप्न आहे. शाहरुख खानच्या फॅन चित्रपटाबाबत ती म्हणाली, नुकताच कुटुंबासोबत हा चित्रपट पाहिला. शाहरुखने चित्रपटात अतिशय उत्तम काम केले आहे. सर्वांनी पाहावा असा हा चित्रपट आहे. यापूर्वी शाहरुखसोबत काम केले आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा अतिशय वेगळा होता. आजा नचले हा डान्स शो केल्यानंतर सध्या मी अमेरिकन शो करत आहे. यात टेरेन्स लेविस आणि बास्को मारटियस माझ्यासोबत काम करत आहेत. या शोची रचना अतिशय वेगळी आहे. त्यामुळे हा शो नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वासही तिने व्यक्त केला.
फ्लाॅपनंतर हिट मिळेलच?
माधुरीने २०१४ मध्ये इश्कियाचा सिक्वेल "डेढ इश्किया' आणि गुलाब गँग हे चित्रपट केले होते. मात्र, दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळे नवीन चित्रपट तरी यशस्वी होतील का? असा प्रश्न विचारला जात आहे.