आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Watch Unseen Footage Of The Making Of A Blockbuster Dilwale Dulhania Le Jayenge

Making of DDLJ: कसा तयार शाहरुख-काजोलचा एव्हरग्रीन सिनेमा, पाहा पडद्यामागील गोष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
20 वर्षांपूर्वी 'DDLJ' च्या सेटवर क्लिक झालेले काजोल, शाहरुख, करण जोहर आणि त्यांच्या सहकलाकारांचे हे छायाचित्र आहे. - Divya Marathi
20 वर्षांपूर्वी 'DDLJ' च्या सेटवर क्लिक झालेले काजोल, शाहरुख, करण जोहर आणि त्यांच्या सहकलाकारांचे हे छायाचित्र आहे.
हिंदी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन सिनेमांच्या यादीतील एक सिनेमा म्हणजे 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'. 1995 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. शाहरुख खान, काजोल आणि दिग्दर्शक आदित्य चोप्राला या सिनेमाने स्टारडम मिळवून दिले.
या सिनेमाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यशराज फिल्म्सने या सिनेमाच्या मेकिंगचे तीन व्हिडिओ रिलीज केले आहेत. या व्हिडिओत सिनेमाच्या कास्ट आणि क्रूचे शूटिंगच्या वेळचे अनुभव शेअर करण्यात आले आहेत. या मेकिंगमध्ये सिनेमाशी निगडीत अनेक पडद्यामागच्या गोष्टी प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहेत.
उदाहरण द्यायचे झाल्यास, ‘रुक जा ओ दिल दिवाने’ गाण्याच्या शेवटी काजोल डान्सफ्लोअरवर पडते. आदित्य आणि शाहरुख खानने काजोलला न सांगताच तिला पाडण्याचा डाव रचला. हेतू हाच की काजोलचे नैसर्गिक हावभाव यावेत. मात्र, या नादात काजोलचा रुद्रावतार त्यांना पहावा लागला. पडल्यावर काजोलला जखम झाली. तिने आदित्य-शाहरुखशी बोलणे टाकले. अखेर तिची समजूत काढण्यात दोघांना यश आले. हा अनुभव या मेकिंगमध्ये शाहरुखने शेअर केला आहे.
शाहरुखसोबतच काजोल, करण जोहर, यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा, संगीतकार जतिन-ललित, कोरिओग्राफर सरोज खान, फराह खान यांनी शूटिंगदरम्यानच्या इंट्रेस्टिंग गोष्टी शेअर केल्या आहेत. 1995 मध्ये सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाल्यानंतर प्रेक्षकांच्या आलेल्या प्रतिक्रियांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'DDLJ'च्या मेकिंगचे तीन व्हिडिओ...