आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळद-मेंदीपासून ते रिसेप्शनपर्यंत, 15 Photos मध्ये पाहा सलमानच्या बहिणीच्या लग्नाची झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नात अर्पितासोबत मस्तीच्या मूडमध्ये सलमान खान दिसला होता. सलमानने चक्क तिच्यासमोर लोटांगण घातले होते. - Divya Marathi
लग्नात अर्पितासोबत मस्तीच्या मूडमध्ये सलमान खान दिसला होता. सलमानने चक्क तिच्यासमोर लोटांगण घातले होते.

एन्टरटेन्मेंट डेस्कः सुपरस्टार सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा हिच्या लग्नाचा आज (18 नोव्हेंबर) पहिला वाढदिवस आहे. 18 नोव्हेंबर 2014 रोजी दिल्ली बेस्ड बिझनेसमन आयुष शर्मासोबत अर्पिता विवाहबद्ध झाली होती. हैदराबाद येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांचा शाही लग्नसोहळा पार पडला होता. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी मुंबईतील हॉटेल ताज लँड्स येथे खान कुटुंबाच्या वतीने जंगी रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत बी टाऊनच नव्हे तर राजकारण, उद्योग जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या होत्या.
16 नोव्हेंबरपासून सुरु झाल्या होत्या विधी
अर्पिता-आयुषच्या लग्नविधींना 16 नोव्हेंबरपासूनच सुरुवात झाली होती. यादिवशी अर्पिताला हळद लागली होती. त्यानंतर दुस-या दिवशी मेंदी आणि संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. संगीत सेरेमनीत शाहरुख खान पाहुणा म्हणून हजर होता. यादिवशी सलमान आणि शाहरुख त्यांच्यातील अनेक वर्षांचे मतभेद विसरुन एकत्र आले होते. अर्पिताला आशीर्वाद देतानाचा दोघांचा फोटो मीडियात विशेष चर्चेत राहिला होता. सेरेमनीत शाहरुख आणि सलमानने एकत्र डान्ससुद्धा केला होता.
लग्नापूर्वीच झाला होता अर्पिताचा गृहप्रवेश
खरं तर लग्नानंतर नववधूचा सासरी गृहप्रवेश होत असल्याची परंपरा आहे. मात्र सलमानच्या बहिणीच्या बाबतीत उलट घडले होते. तिचा गृहप्रवेश लग्नाच्या चार दिवसांआधीच झाला होता. 14 नोव्हेंबर रोजी तिने आयुष शर्माच्या घरी पोहोचून गृहप्रवेशाचा विधी पूर्ण केला होता. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी अर्पिता आणि आयुष विवाहबद्ध झाले होते.
राजकारणी घराण्याशी संबंधित आहे आयुष
28 वर्षीय आयुष शर्मा एख बिझनेसमन असून त्याच्या घराण्याला राजकारणाची पार्श्वभूमी आहे. त्याचे वडील अनिल शर्मा हे हिमाचल प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत. याशिवाय त्याचे आजोबा सुखराम शर्मा हे राजकारणातील मोठे नाव आहे. ते पाच वेळा विधानसभा आणि तीनदा लोकसभा निवडणुकीत विजयी ठरले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आयुष-अर्पिताच्या मेंदी-हळदीपासून ते लग्न-रिसेप्शनपर्यंतचा संपूर्ण अल्बम...