आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूनम-शत्रुघ्न यांच्या लग्नाला झाली 35 वर्षे, सिनेमांत एकत्र केले आहे काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा)
मुंबई- बॉलिवूड अभिनेते आणि राजकिय नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या लग्नाचा आज 35 वर्षे पूर्ण झाले आहेत. 9 जुलै 1980 रोजी शत्रुघ्न यांनी बॉलिवूड अभिनेत्री पूनम चंदिरामानीसोबत लग्न केले. शत्रुघ्न आणि पूनम यांची मुलगी आज बॉलिवू़डची आघाडीची अभिनेत्री आहे. सोनाक्षीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून आई-वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
हा व्हिडिओ 70च्या दशकात आलेल्या 'सबक' सिनेमातील 'बरखा रानी...' गाण्याचा आहे. हे गाणे शत्रुघ्न आणि पूनम यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. दोघांनी अनेक सिनेमांत एकत्र कामदेखील केले आहे. सोनाक्षी शिवाय शत्रु आणि पूनम यांना जुळी मुले कुश आणि लव्हसुध्दा आहेत. कुशचे यावर्षी तरुणा अग्रवालसोबत लग्न झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लग्नापासूनचे आतापर्यंतचे पूनम-शत्रुघ्न यांचे काही PHOTOS...