आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wedding Of Bollywood Actress Asin And Micromax Co Founder Rahul Sharma

ख्रिश्चन पध्दतीने झाले असिन-राहुलचे लग्न, रात्री हिंदू पध्दतीने होणार विवाहबद्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : ख्रिश्चन वेडिंगदरम्यान असिन आणि राहुल - Divya Marathi
फाइल फोटो : ख्रिश्चन वेडिंगदरम्यान असिन आणि राहुल

मुंबई- असिन आज (19 जानेवारी) मायक्रोमॅक्सचा को-फाऊंडर राहुल शर्मा यांचा लग्नसोहळा दिल्लीमध्ये चालू आहे. दोघे ख्रिश्चन पध्दतीने लग्नगाठीत अडकले आहेत. रात्री दोघे हिंदू पध्दतीने पुन्हा लग्न करणार आहेत. हा लग्नसोहळा नवी दिल्लीच्या लग्झरी हॉटेल देवरानमध्ये होणार आहे. लग्नात दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि काही परिचीत लोक सामील होणार आहेत.
रात्री हिंदू धर्मानुसार होईल लग्न...
- ख्रिश्चन पध्दतीने झालेल्या वेडिंग सेरेमनीमध्ये फॅमिली आणि फ्रेंड्स मिळून 50 लोक उपस्थित होते.
- रात्री दोघे हिंदू धर्मानुसार पुन्हा लग्न करणार आहेत. यादरम्यान जवळपास 200 पाहूणे सामील होणार आहेत.
- डिनर पूर्णत: इंडियन आणि शाकाहारी असणार आहे. डिनर हॉटेलच्या लॉन एरिया किंवा बॉलरुममध्ये ठेवण्यात येईल.
- दिल्लीच्या जवळ राहूलच्या एका फार्महाऊसवर गेट-टू-गेदरसुध्दा ठेवण्यात आले आहे.
सेलिब्रिटी शेफ निशांत चौबे तयार करणार क्युजीन...
- निशांत हॉटेल दुसित देवरान येथील शेफ आहे. ते जगातील अशा सहा शेफपैकी एक आहेत.
- ज्यांची लुसियानास्थित जॉन फोल्स क्युलिनरी इन्स्टिट्युट ऑफ अमेरिका येथे ट्रेनिंगसाठी निवड झाली होती.
- ते सिंगापूर येथे झालेल्या वर्ल्ड गोर्मेट समिटमध्येही सहभागी झाले होते. याशिवाय मास्टर शेफसाठीही त्यांची निवड झाली होती. त्यांना बंगाली, इंग्रजी आणि फ्रेंच भाषा अवगत आहे.
- यांच्या कुकिंगचे कौतुक अमिताभ बच्चन, हृतिक रोशनपासून ते सैफ अली खान यांच्यापर्यंत सर्वांनी केले आहे. निशांतच्या हातचे बर्गर सैफला खूप आवडतं.
सब्यसाचीच्या कॉस्ट्यूममध्ये दिसणार असिन...
लग्नात असिन डिझाइनर सब्यसाची मुखर्जीच्या आऊटफिटमध्ये दिसणार आहे.
23 जानेवारीला मुंबईत होणार रिसेप्शन...
दोघे मुंबईमध्ये एक ग्रँड रिसेप्शन देणार आहेत. त्यामध्ये बॉलिवूड आणि बिझनेस क्षेत्रातील दिग्गज पोहोचतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असिनच्या लग्न आणि रिसेप्शनच्या निमंत्रण पत्रिकेची खास झलक...