आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Recall : 6 महिन्यांनंतर अर्पिता-आयुषचे रिसेप्शन, लग्नात थिरकले होते SRK-सल्लू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[डावीकडे, आयुष शर्मा, नववधू अर्पिता (वर), अर्पिताच्या आई सलमा खान (खाली)सोबत आयुष शर्मा, उजवीकडे सलमान खान (वर) आणि आयुष शर्मासोबत शाहरुख खान (खाली) डान्स करताना.]
एन्टरटेन्मेंट डेस्कः हिमाचल प्रदेशातील मंडी येथे 25 मे रोजी सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता खान-शर्मा हिचे वेडिंग रिसेप्शन आहे. या रिसेप्शनमध्ये संपूर्ण खान कुटुंब सहभागी होणार असून रविवारी ते मंडीत दाखल झाले. अर्पिता आणि आयुषच्या लग्नाला सहा महिने झाले आहेत. हे रिसेप्शन अर्पिताचे पती आयुष शर्माच्या कुटुंबीयांनी आयोजित केले आहे.
18 नोव्हेंबर 2014 रोजी झाले होते अर्पिता-आयुषचे लग्न
18 नोव्हेंबर 2014 रोजी अर्पिताचे लग्न दिल्लीतीत व्यावसायित आयुष शर्मासोबत झाले. हैदराबाद येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित शाही लग्नसोहळ्यात दोघे विवाहबद्ध झाले. लग्नानंतर 21 नोव्हेंबर रोजी मुंबईतील हॉटेल ताज लँड्समध्ये खान कुटुंबीयांनी जंगी रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बॉलिवूडसोबतच राजकारण आणि उद्योग जगतातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
राजकीय कुटुंबातील आहे आयुष
28 वर्षीय आयुष शर्मा एक बिझनेसमॅन असून राजकीय कुटुंबातील आहे. त्याचे वडील अनिल शर्मा हिमाचल प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत. याशिवाय त्याचे आजोबा सुखराम शर्मा राजकारणातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. सुखराम शर्मा यांनी आत्तापर्यंत पाच वेळा विधानसभा आणि तीन वेळा लोकसभा निवडणुकीत यश मिळवले आहे. ते यूपीए सरकारमध्ये केंद्रिय संचार मंत्रीसुद्धा होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आयुष-अर्पिताच्या लग्न आणि रिसेप्शनची निवडक छायाचित्रे...