आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वेलकम बॅक'ला बसू शकतो सलमानच्या 'हीरो'चा फटका, कसा ते जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः 'हीरो' सिनेमाच्या पोस्टरवर अभिनेता सूरज पांचोली आणि 'वेलकम बॅक'च्या एका सीनमध्ये जॉन अब्राहम)
यावर्षी 4 सप्टेंबरला इरॉस इंटरनॅशनल आपले दोन सिनेमे रिलीज करण्याच्या तयारीत आहे. डेट बदलण्यावरुन अद्याप कंपनीने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मात्र एकाच दिवशी दोन सिनेमे रिलीज केल्यास हा तोट्याचा बिझनेस होण्याची शक्यता आहे. सूत्र सांगतात, आपल्या प्रॉडक्शनच्या 'हीरो' या सिनेमाला सोलो रिलीज मिळवून देण्यासाठी सलमानच निर्णय घेणार आहे.
खरं तर एखादे प्रॉडक्शन हाऊस एकाच दिवशी आपले सिनेमे रिलीज करत नाहीत. त्याचा बिझनेसला मोठा फटका बसण्याची शक्यता असते. प्रेक्षकवर्ग दोन सिनेमांमध्ये विभागला जातो. 'हीरो' आणि 'वेलकम बॅक'चे वितरण इरॉस इंटरनॅशनल करत आहे. पहिला सलमानच्या बॅनरचा मोठा सिनेमा आहे, तर दुस-या सिनेमासाठी इरॉसने मोठी किंमत चुकती केली आहे. त्यामुळे दोन परिस्थिती निर्माण झाल्या आहेत.
पहिली म्हणजे, जर डेट बदलण्यात आली नाही, तर कुठल्या सिनेमाला किती स्क्रिन्स मिळतील. नवोदितांच्या सिनेमाला एक किंवा दोन हजार स्क्रिन्स सहसा मिळत असतात. सलमानच्या 'हीरो' या सिनेमाला 1600 स्क्रिन्स मिळण्याची अपेक्षा आहे. अथिया शेट्टी आणि सूरज पांचोलीचा मेंटर असलेला सलमान स्क्रिन्स संख्या वाढवूदेखील शकतो. 'वेलकम बॅक' सुपर हिट फ्रेंचायजी असून 2500-3000 स्क्रिन्सवर रिलीज होणारेय.
पुढे वाचा, दुसरी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे...