आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओपनिंग वीकेंड: 51 Cr कमावून वर्षाचा 3rd हाएस्ट ग्रॉसर ठरला 'वेलकम बॅक'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिग्दर्शक अनीस बज्मीच्या 'वेलकम बॅक' सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमाने केवळ तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 51 कोटींचा नेट कलेक्शन केले आहे. याची माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी टि्वटरवर दिली. त्यांनी लिहिले, '#WelcomeBack packs a SOLID punch. Fri 14.35 cr, Sat 17.05 cr, Sun 19.60 cr. Total: ₹ 51 cr. India biz. EXTRAORDINARY!.'
यासोबतच हा ओपनिंग वीकेंडमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा 2015चा तिसरा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. या यादीत 102 कोटींची कमाई करून कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान' पहिला तर करण मल्होत्रा दिग्दर्शित 'ब्रदर्स' 52 कोटींत्या कलेक्शनसोबत दुसरा सिनेमा ठरला आहे.
वर्ल्डवाइड 100 कोटींच्या जवळ
'वेलकम बॅक'चे ग्रॉस कलेक्शन 69 कोटी रुपये आहे. तसेच ओव्हरसीजमध्ये फस्ट वीकेंड सिनेमाची कमाई 28.38 कोटी झाली. या अंदाजे पहिल्या आठवड्यात या सिनेमाची कमाई 90.38 कोटींपर्यंत पोहोचवू शकते. 4 सप्टेंबरला रिलीज झालेल्या या सिनेमात अनिल कपूर, नाना
पाटेकर, जॉन अब्राहम, श्रुती हसन, नसीरुद्दीन शाह आणि परेश रावल मुख्य भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टॉप-10 यादीत इतर कोण-कोणते सिनेमे आहेत...