मुंबई - एकदा एका फिमेल फॅनने अमिताभ बच्चन यांना चांगलेच अडचणीत आणले होते. अमिताभचा हा किस्सा मायापुरी मॅगझिनच्या 1975 च्या एका अंकात प्रसिद्ध झाला होता. अमिताभ एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी बाहेर गेलेले होते. शुटिंगनंतर जेव्हा ते त्यांच्या हॉटेलच्या खोलीत आले त्यावेळी कोणीतरी त्याठिकाणी त्यांची वाट पाहत होते.
.. आणि तिने सोडली साडी
- अमिताभ यांनी त्या तरुणीला सांगितले की, ते थकलेले आहेत आणि त्यांना आराम करायचा आहे. पण तरीही ती अमिताभ यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागली. त्यांच्यावर खूप प्रेम असल्याचे ती सांगू लागली.
- तिचे बोलणे ऐकून बिग बींना धक्का बसला. त्यांनी तिला निघून जाण्यास सांगितले. ते दरवाजा उघडायला गेले. पण तरुणी ऐकायला तयार नव्हती. तिने उलट दरवाजा आतून लॉक केला.
- एवढेच नाही तर ती बिग बींना ब्लॅकमेक करू लागली होती. त्यांच्यासमोर साडी सोडली आणि तिचे म्हणणे ऐकले नाही तर आरडाओरडा करण्याची धमकी दिली.
अमिताभ यांनी लढवली शक्कल..
- तरुणीच्या धमकीनंतर अमिताभ काहीसे नरमले. ती मानसिक रुग्ण असेल असे त्यांना वाटले. त्यांनी शांततेने विचारपूर्वक पुढचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
- त्यांनी तरुणीला विश्वासात घेतले. काही वेळाने बिग बींनी चहासाठी फोन केला. तेव्हा तरुणीने काही चलाखी करू नका अशी धमकीही दिली.
- वेटर चहा घेऊन आला तेव्हाही तरुणी दार उघण्यासाठी त्यांच्या मागे गेली. दरवाजा उघडल्यानंतर वेटर चहा ठेवण्यासाठी आत आला तेवढ्यात बिग बींनी तिला उचलले आणि बाहेर काढले. लगेचच आत येत त्यांनी दार आतून लावून घेतले.
रिसेप्शनला दिली माहिती...
- तरुणी खोलीच्या बाहेर गेली त्यावेळी बिग बींनी रिसेप्शनवर फोन करून सांगितले की, ती तरुणी त्यांना त्रास देत आहे.
- त्यानंतर हॉटेल स्टाफने तरुणीला बाहेर काढले, आणि बिग बींचा जीव भांड्यात पडला.
- बिग बींच्या मते तरुणीने त्यांना सांगितले होते की, हॉटेल स्टाफच्या मदतीने ती त्यांच्या खोलीपर्यंत पोहोचली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, बिग बींच्या फॅन्सचे असेच काही इतर किस्से...