आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

86 देशांच्या मॉडेल्सना पछाडत ऐश्वर्या बनली होती Miss World, पाहा 1994चे फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 42 वर्षांची झाली आहे. 1 नोव्हेंबर 1973ला मेंगलुरु, कर्नाटकमध्ये जन्मलेल्या ऐश्वर्याने 1994मध्ये मिस वर्ल्डचा किताब नावी केला होता. या स्पर्धेत विविध देशांतील 87 मॉडेल्स आल्या होत्या. ऐश्वर्या यामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत होती.
ही स्पर्धा सन सिटी एंटरटेन्मेंट सेंटर, सन सिटी दक्षिण आफ्रिकेत झाली होती. येथे ऐश्वर्याने या स्पर्धेचा किताब नावी केला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेची बॅसेतस्ना मॅकगालेमेला पहिला रनरअप आणि व्हॅनेज्युएलाची इरिन फेरीरा दुसरी रनरअप ठरली होती.
मिस वर्ल्ड 1993ने डोक्यावर सजवला ताज-
ऐश्वर्या रायच्या डोक्यावर मिस वर्ल्डचा ताज 1993च्या मिस वर्ल्ड जमॅकाची रहिवासी लीसा हन्नाने सजवला होता. मिस वर्ल्डचा ताज डोक्यावर सजवणारी ऐश्वर्या दुसरी भारतीय मॉडेल आहे. यापूर्वी 1966मध्ये मुंबईची रीता फारियाने हा पुरस्कार जिंकला होता.
सर्वात यशस्वी मिस वर्ल्ड-
ऐश्वर्या राय बच्चनला 2014च्या मिस वर्ल्ड पीजेंटदरम्यान सर्वात यशस्वी मॉडेलचा सन्मान देण्यात आला होता. डिसेंबर 2014मध्ये झालेल्या स्पर्धेत तिला चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 1994मध्ये मिस इंडिया स्पर्धेतील ऐश्वर्याची निवडक छायाचित्रे...