आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Amitabh Bachchan Delivered First Marathi Speech

अमिताभ यांचे संपूर्ण भाषण प्रथमच मराठीत, शिल्पकार चरित्र काेशाचे प्रकाशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महानायक अमिताभ बच्चन नेहमीच काही तरी नवीन शिकण्याची इच्छा बाळगतात. याचा प्रत्यय नुकताच पुन्हा एकदा आला. मंगळवारी रात्री बच्चन यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात पहिल्यांदाच आपले संपूर्ण भाषण मराठीत करून सर्वांना सुखद धक्का दिला. निमित्त होते "अाधुनिक महाराष्ट्राची जडणघडण, शिल्पकार चरित्र कोशा’च्या प्रकाशनाचे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर उपस्थिती होते. बच्चन म्हणाले, "मी आज मराठीत बोलण्याचा प्रयत्न करत आहे. अवघड आहे, मात्र अशक्य नाही. काही चुकले तर मला माफ करा. मला मराठी कळते. मात्र, बोलण्यामध्ये थोडी अडचण िनर्माण होते.' बच्चन यांच्या भाषणाला फडणवीस, प्रभावळकर यांच्यासह उपस्थितांनी भरभरून दाद दिली. याआधीही बच्चन यांनी काही कार्यक्रमांतील भाषणांची फक्त सुरुवात मराठीतून केली होती.

फेसबुकवर २ कोटी १० लाख फॉलोअर
महानायक अमिताभ बच्चन यांचे सोशल मीडिया साइट फेसबुकवर तब्बल दोन कोटी १० लाख चाहते झाले आहेत. आणखी काही दिवसांत फॉलाेअर्सचा आकडा तीन कोटींपर्यंत नेण्याची इच्छा असल्याचे बच्चन यांनी सांगितले. दरम्यान, दोन कोटींचा टप्पा ओलांडल्याबद्दल अमिताभ यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.