आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांत शाहरुख, अक्षयसह अनेक सेलेब्सना धमकावले आहे अंडरवर्ल्डने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- शाहरुख खान आणि अक्षय कुमार)
मुंबई- बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगला नुकतीच कुख्यात गुंड रवी पुजारीच्या गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पुजारीने अरिजीतकडे 5 कोटींच्या खंडणीची मागणी केली असून पैसे न दिल्यास त्याला जीवे मारण्यात येईल असे त्याला धमकावण्यात आले आहे. अरिजीतला 'आशिकी 2' मधील 'क्योंकी की तुम ही हो...' या गाण्यामुळे प्रसिद्धी मिळाली आहे.
असे पहिल्यांदाच घडतेय असे नाहीये, मागील दोन वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड पाहिले तर शाहरुख खान, अक्षय कुमार आणि सोनू निगमसारख्या अनेक सेलेब्सना फोन करून धमकावले आहे. जाणून घेऊया 2013पासून आतापर्यंत बॉलिवूड स्टार्सना मिळालेल्या धमक्यांविषयी...
शाहरुख खान 'हॅपी न्यू इअर'च्या रिलीजपूर्वी मिळाली होती धमकी-
2014मध्ये 'हॅपी न्यू इअर' सिनेमा रिलीज होण्यापूर्वी शाहरुख खानला अंडरवर्ल्ड डॉन रवि पूजारीने धमकी दिली होती. त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आणि शाहरुखने स्वत:साठी बॉम्बप्रूफ गाडीसुध्दा खरेदी केली होती. सांगितले जाते, की यादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने शाहरुखचा बिझनेस पार्टनर अली मोरानीवर जुहूमध्ये फायरिंग केली होती. इतकेच नव्हे, काही दिवसानंतर 'हॅपी न्यू इअर'मधील शाहरुखचा को-स्टार बोमन ईराणी आणि सोनू सुदलासुध्दा एका अज्ञात नंबरवरून धमकीचे फोन आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर सेलेब्सला आलेल्या धमकींविषयी...