आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरंच पोर्न स्टार बनली असती कंगना? जाणून घ्या व्हायरल बातमीमागचे काय आहे सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः  अभिनयासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारी आघाडीची अभिनेत्री कंगना रनोट अभिनयासोबतच बोल्ड वक्तव्यांनीही नेहमीच चर्चेत राहते. नुकतेच तिने एक खुलासा वजा वक्तव्य केले आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका टीव्ही शोमध्ये बोलताना कंगनाने म्हटले की, जर मला ‘गॅंगस्टर’मध्ये त्या वेळी काम मिळाले नसते तर आज मी अॅडल्ट सिनेमांत काम करत असते. या बातमीनंतर कंगना रनोटच्या स्पोक्सपर्सनने मीडियात चर्चेत असलेल्या ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. कंगना कधीच अॅडल्ट सिनेमे करणार नव्हती, असे यामध्ये म्हटले आहे.  
 
divyamarathi.com सोबत केलेल्या बातचीतमध्ये कंगनाच्या स्पोक्सपर्सनने सांगितले, "कंगना सध्या देशाबाहेर आहे. मीडियात सुरु असलेली बातमी सपशेल खोटी आहे. कंगनाचे हे वक्तव्य वेगळ्या रेफरन्समध्ये होते. मात्र त्याला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले.  VH1 साठी हे एक कँडिड कन्व्हर्सेशन होते. या सगळ्या गोष्टी गमतीशीर पद्धतीने कंगनाने सांगितल्या होत्या." 

मीडिया रिपोर्ट्समध्ये काय सांगितले गेले... 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीन वेळा नॅशनल अवॉर्ड आपल्या नावी करणा-या कंगना रनोटने एका टीवी शोमध्ये कबुली दिली होती, जर तिला 'गँगस्टर' सिनेमा मिळाला नसता, तर ती एक अॅडल्ट अॅक्ट्रेस बनली असती. त्यावेळी ती 17-18 वर्षांची होती आणि मिळालेली प्रत्येक ऑफर ती स्वीकारत होती.  
 
ट्रान्सपरंट कपड्यांत केले होते फोटोशूट...
कंगनाने म्हटले की, ‘गॅंगस्टर’ सिनेमात काम मिळण्यापूर्वी मला अॅडल्ट सिनेमात काम करण्यासाठी अनेक ऑफर आल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी माझ्याकडे बॉलिवूडचा कोणताही सिनेमा नव्हता. त्यामुळे ‘गॅंगस्टर’ची ऑफर येताच ती मी पटकन स्वीकारली. गँगस्टरपूर्वी मी एक फोटोशूट केले होते. ज्यात मला रोब (अत्यंत पातळ आणि सैल कपडा) घालण्यासाठी दिला होता. हा कपडा अंगात घालायचा होता मात्र, त्याच्या आत काहीच घालायचे नव्हते. हे सर्व मला त्या वेळी ठिक वाटले कारण, तो सिनेमा तितका चांगला नव्हता. मी तो अॅडल्ट सिनेमा सोडल्यानंतर मला निर्मात्यांची नाराजी सहन करावी लागली होती.’

कंगनाला कसा मिळाला होता 'गँगस्टर'
कंगनाने हा किस्सा 'द अनुपम खेर शो : कुछ भी हो सकता है'मध्ये शेअर केला होता. ती म्हणाली होती, "मी विचार केला, की एक महिना मुंबईत राहून सिनेमांसाठी ऑडीशन देणे सोयीचे ठरेल. मी 10-15 मुलींसोबत एका शूटसाठी बसली होती. तेव्हा मला एका एजंटचा फोन आला. तो मला महेश भट यांच्या ऑफिसमधअये घेऊन गेला. तेथे माझी भेट मोहित सूरी आणि अनुराग बसूसोबत झाली. त्यांनी माझी छायाचित्रे पाहिली आणि मला रोलसाठी ऑडिशन देण्यास सांगितले. मात्र  भट साहेब म्हणाले - 'ही मुलगी खूप लहान आहे. 17-18 वर्षांची असेल. आम्हाला एक मॅच्युअल मुलगी हवी आहे, ती किमान 28-29 वर्षांची असेल.' त्यानंतर माझ्या ऐकिवात आले, की गँगस्टरसाठी शायनी आहुजा आणि चित्रांगदा सिंह यांना साइन करण्यात आले आहे."

दोन महिन्यांनी मला अचानक अनुराग यांचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितले, आम्ही शूटिंगसाठी आम्ही आउटडोर जात आहोत. मात्र चित्रांगदाला सध्या आमच्यासोबत येणे शक्य नाही. त्यांनी हेही सांगितले, की माझा मेकअप असा करुन देण्यात येईल जेणेकरुन मी  मॅच्युअर दिसेल. इतकेच नाही, तर मीच ही भूमिका करु शकते, असेही अनुराग यांनी मला म्हटले होते. अशा प्रकारे माझी 'गँगस्टर'मध्ये वर्णी लागली.  

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा, कंगनाच्या अवॉर्ड्स आणि नेक्स्ट प्रोजेक्ट्स विषयी...  
बातम्या आणखी आहेत...