आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान-शाहरुखवर ओम पुरींनी केली होती तिखट टीका, वाचा शेवटची मुलाखत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ओम पुरींनी विविध विषयावर मत मांडताना कधीही कुणाची भिती बाळगली नाही. प्रत्‍येक मुलाखतीमध्‍ये त्‍यांचा हा अंदाज दिसून आला आहे. अगदी स्‍वत: विषयी देखील त्‍यांनी अतिशय निर्भिडपणे मत व्‍यक्त केले आहे. ओम पुरी स्‍वत:ला स्‍टार समजत नसत. बदलत्‍या काळाला त्‍यांनी समजून घेतले होते.
 
त्‍यांना कळून चुकले होते की, आता हिंदी सिनेमात त्‍यांना ठराविक भूमिकाच करायला मिळतील. चित्रपटांच्‍या खालावणाऱ्या दर्जाबद्दल त्‍यांना फारशी चिंता नव्‍हती.  ते म्‍हणाले होते, 'मला चित्रपटसृष्‍टीत जे काम करायचे होते, ते मी प्रामाणिक केले आहे'. अशा कलाकारांचा मृत्‍यू अर्धसत्‍य असतो. त्‍यांचा दमदार अभिनय आणि आवाज पडद्यावर नेहमी जिवंत राहिल. 
वाचा, ओम पुरी यांनी सलोनी अरोरा यांना काही दिवसांपूर्वी दिलेली मुलाखत.
 
Q- चार दशकांपूर्वी सामान्‍य अभिनेता होता. आज स्‍टार आहात. कसे बघता या प्रवासाकडे?
 
मी स्‍वत:ला स्‍टार समजत नाही. मी अभिनेता आहे. माझे काम प्रामाणिकपणे केले आहे. काही वर्षात या जगाचा निरोप घेईल. सध्‍या चित्रपटसृष्‍टीत काय चालू आहे याच्‍याशी मला काही देणेघेणे नाही. पूर्वी अभिनेता त्‍याला म्‍हणायचे जो लोकांना हसवायचा, रडवायचा. आता सिक्‍स पॅक अॅब्‍स, बॉडी आणि गाडी उडवणाऱ्यांना अभिनेता म्‍हटले जाते. मी अनेक असे चित्रपट केले आहेत, ज्‍यांना कायम लक्षात ठेवले जाईल. 
 
Q- आज चित्रपटसृष्‍टीत तुम्‍हाला जे स्‍थान दिले जाते त्‍याबद्दल तुम्‍ही समाधानी आहात का? 

मी तर हवालदार आहे. सलमान, शाहरुख हे कॅप्‍टन, कर्नल आणि हिरो आहेत. माझ्या चित्रपटांसाठी कुणी 400 रुपयांचे तिकिट खरेदी करणार नाही. प्रयत्‍न इतकाच आहे की, मोठे सिनेमे असो की लहान, जि‍तके मनोरंजन करता येईल तितके करायचे. 
 
पुढील स्‍लाईडवर पहा, ओम पुरींनी स्‍वत:ला हवालदार का म्‍हटले आणि उर्वरित मुलाखत 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...