आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Preity Zinta Celebrated Lohri With Former British Prime Minister

जेव्हा प्रिती झिंटाने ब्रिटेनचे माजी पंतप्रधानांच्या पत्नीसोबत साजरी केली होती लोहडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिती झिंटा, चेरी ब्लेअर आणि इतर पाहूणे - Divya Marathi
प्रिती झिंटा, चेरी ब्लेअर आणि इतर पाहूणे
मुंबई- लोहडीचा सण विशेषत: पंजाबमध्ये साजरा केला जातो. परंतु बॉलिवूडमध्येसुध्दा याची धूम पाहायला मिळते. यावेळी हा सण बुधवारी (13 जानेवारी) साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे, 6 वर्षांपूर्वीसुध्दा हा सण बुधवारीच आला होता आणि त्यावेळी प्रिती झिंटाने नवी दिल्लीमध्ये सण साजरा केला होता.
ब्रिटेनचे माजी पंतप्रधानच्या पत्नीसोबत साजरी केली होती लोहडी...
13 जानेवारी 2010ला प्रिती झिंटाने लोहडी ब्रिटेनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची पत्नी चेरी ब्लेअरसोबत हा सण साजरा केला होता. प्रिती त्यावेळी चेरी ब्लेअर यांची ट्रस्ट लूम्बाची ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर होती. चेरी या ट्रस्टकडून विधवांची दुर्दशा पाहून लोकांना जागृत करण्यासाठी भारतात आल्या होत्या. लूम्बा ट्रस्ट विधवांच्या उत्थानसाठी काम करते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रिती झिंटाच्या या सेलिब्रेशनचे काही PHOTOS...