आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिगरवरुन केलेल्या अश्लिल कमेंटमुळे अभिनेत्री भडकली, दिले सडेतोड उत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अभिनेत्री विशाखा सिंह, सोबतच तिच्या फेसबुक वॉलवर पोस्ट करण्यात आलेली वादग्रस्त कमेंट)
मुंबईः 2013 मध्ये 'फुकरे' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री विशाखा सिंह चर्चेत आली आहे. यावेळी तिचे चर्चेत राहण्याचे कारण एखादा आगामी सिनेमा नव्हे तर इंटरनेटवर निर्माण झालेला वाद आहे.
सविस्तर वृत्त असे, की मोहम्मद मुस्तकिम सैफी (MD. Mustakim Saifi) नावाच्या विशाखाच्या फॉलोअरने तिच्या फेसबुक फोटोवर एक अश्लिल कमेंट दिली. या व्यक्तीने विशाखाच्या छातीवरून अभद्र कमेंट केली होती. त्याने लिहिले "Nice looking & nice boobs".
विशाखाने या कमेंटकडे मुळीच दुर्लक्ष केले नाही, उलट त्याला सडेतोड उत्तर दिले. या कमेंटवर विशाखाने या व्यक्तीला आपल्या पद्धतीने उत्तर दिले. विशाखाने म्हटले, "मिस्टर मुस्तकिम सैफी, जर दम असेल, तर स्वत:चा फेसबुक प्रोफाईल फोटो ठेव आणि मग कमेंट कर"
विशाखाने लिहिले, "मी एक स्त्री आहे हे जाणते. तुझ्या ज्ञानात भर घालावी म्हणून सांगते, की सर्व मुलींना छाती असते. तुझी आई, बहीण, बायको, मुलगी या सर्वांना आहे. त्यामुळे तू जे मला विचारलं, त्यांनाही हेच विचारतोस का? जर हिम्मत असेल, तर माझ्या समोर येऊन हे सांग". [Mr. MD Mustakim Saifi, 1) remove that innocent child's pictures as your dp. 2)have the guts to put your own profile picture. And then comment. 3) Nice boobs. I know i am a woman.. And for your general knowledge, Yes All women have breasts. Your mother, sister, wife, grandmother, aunts, daughter, friends. All of themincluded. Do you walk up to them and say 'nice boobs'? Feel sorry for you. Have the guts to say it on my face? Else get off my page."]
विशाखा इथवरच थांबली नाही. जेव्हा विकास सिंह नावाच्या एका व्यक्तीने तिच्या टीशर्टवर लिहिलेल्या वाक्यावरुन कमेंट केले, तेव्हासुद्धा विशाखाने त्याला चोख उत्तर दिले. विकासने विशाखाच्या टी-शर्टवर लिहिलेल्या कोटवर टीका केली होती. त्याने लिहिले होते, "Thought is worth but position generally regard us tharki...miss"
यावर विशाखाने उत्तर दिले, "Well Vikas Singh. you are look educated. Where do you think quote on a Tshirt be? Shoulders?Arms?Stop making such juvenile comments. If you derive childish pleasure out of the facts that it's on the chest area, then God help women and women safety issues."
विशाखाने डिलिट केल्या पोस्ट
विशाखाने आपल्या फेसबुक वॉलवरुन वादग्रस्त पोस्ट डिलिट केल्या आहेत. तिच्या मते, ती कुणाला घाबरत नाही. मात्र निगेटिव्हिटीपासून मुक्तता मिळवण्यासाठी तिने पोस्ट डिलिट केल्या. विशाखाने फेसबुकवर लिहिले, "Deleted the post that went viral. Not afraid of anyone but simply tired of unwanted negativity. A big thanks to all those who supported."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, विशाखाच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेले वादग्रस्त स्टेटस आणि त्यावरचे तिचे उत्तर, सोबतच याप्रकरणाशी निगडीत आणखी काही कमेंट्स....