आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Yerwada Jail Inmates Dedicated Song For Sanjay Dutt, Munnabhai Gets Emotional

आणि शेवटच्या दिवशी जेलमध्ये ढसाढसा रडला संजय दत्त, वाचा Exclusive Report

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुण्यातील येरवडा कारागृहातील २४ फेब्रुवारीचा दिवस मुंबई बॉम्बस्फोटातील आराेपी व अभिनेता संजय दत्तसाठी अखेरचा दिवस हाेता. गुरुवारी सुटका होणार म्हणून एकीकडे कुटुंबीय संजयच्या स्वागताची जल्लाेषात तयारी करत आहेत, तर दुसरीकडे तुरुंगात गेेल्या साडेतीन वर्षांपासून झालेल्या मित्रांसोबत गप्पा करताना संजयला रडू कोसळले. येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असताना संजय रेडिओ जॉकी बनला होता. तुरुंगातील खासगी रेडिओसाठी त्याने बुधवारी दुपारी आपला शेवटचा रेडिओ शो रेकॉर्ड केला. तो तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर २५ फेब्रुवारीला हा शो कारागृहात प्रसारित करण्यात येणार आहे.

शिक्षेदरम्यान संजयने तुरुंगातील इतर कैद्यांसाठी दररोज आपला रेडिओ शो दुपारी ११ ते १ च्या दरम्यान केला. या शोच्या माध्यमातून संजयला तुरुंगातील इतर कैद्यांना भेटता आले. बुधवारी दुपारी संजयने २५ तारखेचा शो रेकॉर्ड केला, तेव्हा कटिंग चहासोबत त्याच्या इतर कैद्यांशी अनौपचारिक गप्पाही रंगल्या होत्या. या वेळी त्याच्याकडे ‘मुन्नाभाई’ चित्रपटातील सुप्रसिद्ध संवाद म्हणण्याच्या आणि काही गाण्यांच्या फर्माईशी येत होत्या. मात्र, आठवणींमध्ये रंगलेल्या संजयला जेव्हा त्याच्या १९८० च्या दशकातील नाम चित्रपटातल्या ‘तू कल चला जायेगा तो मैं क्या करूँगा’ या गाण्याची फर्माईश करण्यात आली, तेव्हा मात्र संजय ढसाढसा रडला.

कैदीही झाले भावुक
संजयसोबत शेवटच्या दिवशी झालेल्या अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमामध्ये संजयच नाही, तर त्याच्याशी ऋणानुबंध जुळलेले काही कैदीही थोडे भावूक झाले होते आणि मग कार्यक्रम आटोपता घेताना मुन्नाभाईने त्याची पेटंट ‘जादू की झप्पी’ सगळ्यांना दिली. दरम्यान, संजय दत्तने कैद्यांना दरवर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात येत जाईन, असेही आश्वासन दिले आहे.

सकाळी १० वाजता सुटणार
गुरुवारी सकाळी दहा वाजता संजय दत्तला कारागृहातून मुक्त केले जाईल. तत्पूर्वी कारागृहात येण्यापूर्वी त्याच्याकडील जमा करून घेतलेल्या वस्तू परत केल्या जातील. तसेच बायाेमेट्रिक तपासणी केल्यानंतर त्याला मुक्तता प्रमाणपत्र दिले जाईल. शिक्षेच्या दरम्यान केलेल्या कामाचा माेबदलाही दिला जाईल, अशी माहिती येरवडा कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी सांगितले. दरम्यान, संजयच्या सुटकेविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी बुधवारी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली.

रेडियो शोच्या रेकॉर्डिंगमध्ये संजयने जाता जाता दिलेला हा संदेश –
“गुड आफ्टरनून भाई लोग, आप जब तक कनेक्ट होंगे, तब तक तुम लोगों के लिये यह लास्ट मेसेज छोड के मैं जा चुका रहूँगा।.. खुश रहना.. साथ रहना.. जुर्म करके किसीका भी भला नहीं हुआ.. सच्चाई के राह पर चलना भाई लोग”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ह्याअगोदरही मिडीयासमोर रडला होता मुन्नाभाई