आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Is Prasadrao Peshwe? Asking Bajiro Peshwa\'s Heirs

बाजीरावांविषयी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीणारे प्रसादराव पेशवे बाजीरावांचे वंशज नाहीत, Read More

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसादराव पेशवे ह्यांनी ‘बाजीराव मस्तानी’ ह्या चित्रपटातल्या ‘पिंगा’ गाण्याविषयी आक्षेप नोंदवणारे एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहीले आहे. त्यामुळे प्रसादरावांच्या आडनावामूळे ते बाजीरावांचे वंशज असल्याचा गैरसमज अनेकांचा झाला आहे. पण हे पेशवे म्हणजे कोणी वेगळे असल्याचे पेशवा राजघराण्याच्या वंशजांनी सांगितले आहे.
पेशव्यांची १३वी पिढी पूण्यात राहते. ह्या तेराव्या पिढीतील चुलत्यांची सध्या दोन कुटूंबच आहेत. प्रसादराव पेशवेंच्या पत्राविषयी बोलताना महेंद्र पेशवा म्हणतात, “अगदीच खोलात जाऊन सांगायचे तर आम्ही कोकणस्थ ब्राम्हण आहोत. आणि आम्ही पेशवा हे आडनाव लावतो. पेशवे आडनाव लावणारे देशस्थ ब्राम्हण आहेत. ते बहूदा सासवडच्या आसपास सापडतात. त्यामूळे हे प्रसादराव पेशवे त्यांच्यापैकीच कोणी असावते. हे आमच्या पेशवा घराण्यातले नाहीत. आम्ही त्यांना ओळखत नाही.”
महेंद्र पेशव्यांची बहिण मोहिनी पेशवा करकरे म्हणतात, “आम्ही त्यांना ओळखत नसलो, तरीही जर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले असेल, तर ते स्वागतार्हच आहे. कारण बाजीरावांवर, पेशव्यांवर आणि इतिहासावर प्रेम करणारे असे असंख्य लोकं असतील, ज्यांना पिंगा गाण्याने पेशवा राजघराण्याचा झालेला अपमान आवडला नसेल. त्यामूळे अशा सर्व चाहत्यांचा नक्कीच आम्हांला आदर वाटतो.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बाजीरावांचे खरे वंशज