आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...म्हणून इराणी दिग्दर्शकाने दीपिका पदुकोणला केले होते रिजेक्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई- गोव्यात सुरु असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) ची सुरुवात इराणी दिग्दर्शक माजिद मजिदी यांच्या 'बियाँड द क्लॉउड्स' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगने झाली. या चित्रपटात दीपिका पदुकोणचे नाव फायनल झाल्याची चर्चा असतानाच मालविका मोहनन हिची वर्णी चित्रपटात लागली.

 

‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटातील तारा या भूमिकेसाठी माजिद मजिदी यांनी दीपिकाची निवड केली होती. यासाठी तिने ऑडिशनसुद्धा दिलं होतं. गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मजिदी म्हणाले की, ‘एखादा मोठा स्टार चित्रपटात असला की काही गोष्टी हाताळणे अवघड जाते. ती जेव्हा ऑडिशनसाठी आली होती, तेव्हाच लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. तिला पाहण्यासाठी चाहत्यांचा घोळकाच झाला होता.’चाहत्यांच्या घोळक्यामुळे शूटिंगमध्ये व्यत्यय निर्माण होत असल्याने अखेर मजिदी यांनी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याचा निर्णय घेतला. 


‘बियाँड द क्लाऊड्स’ हा इफ्फीत ओपनिंग चित्रपट म्हणून दाखवला गेला. यामध्ये मालविका मोहनन आणि शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, दीपिका आणि फिल्मचे पोस्टर... 

बातम्या आणखी आहेत...