आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी म्हणाली, बलात्काराचा आरोपामुळे इंदर आतून खचला होता, त्याला यातून सोडवायचंय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अॅक्टर इंदर कुमार याच्या निधनानंतर आता त्याची पत्नी पल्लनी कुमार हिने त्याच्यावर झालेल्या बलात्कारांच्या आरोपातून त्याची मुक्तता करण्याचा विडा उचलला आहे. इंदर कुमारला आर्थिक अडचणीचा तणाव होताच, पण शिवाय त्याच्या मनात बलात्काराच्या आरोपाची खंत होती, आणि त्यामुळे तो आतून खचला होता, असे ती म्हणाली. त्यामुळे मृत्यूनंतर तरी त्याला निर्दोष मुक्त करणार असल्याचे तिने ठरवले आहे. 

एका मॉडेलने इंदर कुमारवर कामाचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणी इंदर कुमारला तुरुंगात जावं लागलं होतं. त्याचबरोबर नंतर कोर्टात चाललेल्या खटल्यामुळेही तो प्रचंड तणावात होता, असे त्याच्या पत्नीने एका वेबसाईटशी बोलताना सांगितले. बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू झाल्यास खटला निकाली निघतो. पण त्याच्या पत्नीने हा खटला सुरू ठेवण्यासाठी अर्ज केला आहे. त्याच्यावर प्रसिद्धी आणि पैसा उकळण्यासाठी खोटा आरोप केल्याचे ती म्हणाली. हा खटला जिंकून इंदरला मुक्त करण्यात यश मिळेल असा विश्वास तिने व्यक्त केला. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज..
बातम्या आणखी आहेत...