आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Within Two Years Will Get Married With Katrina Ranbir Kapoor

चर्चेतील लव्हस्टोरी: रणबीर म्हणतो, \'लगेच नाही, कतरिनाशी दोन वर्षांत लग्न\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः रणबीर कपूर आणि कतरिना कैफ)
पणजी - कतरिना आणि मी एकमेकांचे होणार ही काळ्या दगडावरची रेघ असून त्यात काहीही गॉसिप नाही. या वर्षी आम्ही दोघेही कामामध्ये व्यस्त असल्याने लग्न करणे शक्य नसून येत्या दोन वर्षांत मात्र आम्ही दोघे निश्चित लग्न करू अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर याने खास 'दिव्य मराठी'शी बोलताना त्याच्या कतरिना कैफवरील प्रेमाची जाहीररीत्या प्रथमच कबुली दिली.

अनुराग कश्यपच्या 'बॉम्बे वेल्वेट'च्या चित्रिकरणानिमित्त येथे आला असता त्याने दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक गोष्टींचा उलगडा केला. गेल्या एक-दोन वर्षांपासून कतरीना आणि रणबीर कपूरच्या प्रेमाची चर्चा सुरु होती. या दोघांनी गुपचुप साखरपुडाही केल्याची बातमी आली होती. त्यापूर्वी या दोघांचे परदेशातील बीचवरील फोटोही सोशल मीडियावरून चर्चित झाले होते. स्वतः रणबीर वा कतरीनानेच हे फोटो सोशल मीडियात पाठवल्याचीही चर्चा होती. याबाबत रणबीर कपूरशी बोलताना त्याने म्हटले, सोशल मीडियावर आमचे बीचवरील जे फोटो आले होते ते आम्हीच पाठवले असे म्हटले जात असले तरी त्यात काही तथ्य नाही. आम्ही दोघेही जबाबदार आहोत आणि आमच्या प्रेमाची माहिती जगाला अशा पद्धतीने करून द्यायची आम्हाला गरज नाही. ते फोटो कसे आले आणि कोणी पाठवले ते ठाऊक नाही, मात्र आम्हाला अशा सवंग प्रसिद्धीची गरज नाही.
राहता राहिला लग्नाचा प्रश्न, तर आम्ही दोघे एकमेकांवर प्रचंड प्रेम करीत असून आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. यावर्षी आम्ही दोघेही चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यस्त आहोत. त्यातून लवकर वेळ काढणे आम्हाला शक्य नाही. त्यामुळे पुढील वर्षी वा त्यापुढील वर्षी आम्ही दोघे नक्की विवाहबद्ध होऊ, असेही रणबीरने बोलताना स्पष्ट केले.

निर्मिती क्षेत्रात उतरणार, जग्गा जासूस पहिला चित्रपट
आरके बॅनरचे पुनरुज्जीवन करणार होतास त्याचे काय झाले असे विचारता, रणबीर म्हणाला, माझा तसा विचार होता, परंतु काही कारणामुळे ते शक्य होईल असे वाटत नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे या बॅनरवर फक्त माझ्या वडिलांचा वा माझा अधिकार नाही तर यामध्ये माझे काका रणधीर कपूर, राजीव कपूर यांचाही अधिकार आहे. मला जसा चित्रपट बनवावा वाटतो तसा त्यांना बनवावा वाटत नाही आणि त्यांना जसा चित्रपट बनवायचा आहे तसा चित्रपट मला बनवावासा वाटत नाही. त्यामुळे आरके बॅनरचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार मी सोडून दिला आहे. त्याऐवजी मी स्वतःच निर्माता बनणार असून दिग्दर्शकाबरोबर ५०-५० टक्के भागीदारीत चित्रपट बनवणार आहे. 'जग्गा जासूस' हा माझी निर्मिती असलेला पहिला चित्रपट असेल,
असे रणबीर म्हणाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या रणबीर-कतरिना कसे आले जवळ...