Home »News» Woman Asks Junior Bachchan Why Aaradhya Not Going School

यूजरने विचारले- आराध्या स्कूलला जात नाही का? भडकलेल्या अभिषेकने दिले हे उत्तर

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 00:10 AM IST

  • अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याच्या कडेवर आराध्या.

मुंबई- अभिषेक बच्चन त्याची मुलगी आराध्याबद्दल अतिशय पजेसिव्ह आणि प्रोटेक्टिव्ह आहे. आराध्याबद्दल कोणी एकही वाकडा शब्द बोललेला त्याला सहन होत नाही. नुकतेच एका ट्विटर यूजर- शेरियन पटेदियन यांनी कमेंट करुन अभिषेकला विचारले होते, 'तुमची मुलगी शाळेत जात नाही का? मला आश्चर्य वाटते की अशी कोणती शाळा आहे, जी रोज मुलीला आईसोबत ट्रिपवर जाण्याची परवानगी देते. की मग तुम्ही तिला ब्यूटी विदाऊट ब्रेन्स करण्याच्या विचारात आहात. कारण ती रोज आपल्या घमेंडी आईच्या हातात हात टाकून फिरताना दिसते. तिचे बालपण हे इतर सामान्य मुलांपेक्षा फार वेगळे आहे.'

अभिषेक भडकला- दिले हे उत्तर..
- आराध्याबद्दलची ही कमेंट पाहून अभिषेक भडकला नसता तरच नवल. त्याने यूजरला उत्तर देताना म्हटले, 'मॅम, जेवढी माझी माहिती आहे, त्यानुसार विकेंडला बहुतेक शाळा बंद असतात आणि आराध्या विकडेजला शाळेत जाते. तुमच्या ट्विटमधील चुका पाहिल्यानंतर मला असे वाटते की तुम्हालाही शाळेत जाण्याची गरज आहे.'


- यावर यूजरने अभिषेकने रिस्पॉन्स दिल्याबद्दल धन्यवाद देत म्हटले, 'बहुतेक लोक हे माझ्याप्रमाणेच विचार करतात, फक्त कोणी प्रश्न विचारण्याची हिम्मत करत नाही. तुम्हा लोकांनी आईच्या हातात हात टाकून फिरतांनाच्या फोटोंसोबत मुलांच्या नॉर्मल लाइफचेही काही फोटो शेअर केले पाहिजे.'

पुढील स्लाइडमध्ये, पाहा ट्विटर यूजरला अभिषेकने दिलेले उत्तर...

Next Article

Recommended