आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉपिंगसाठी गेलेल्या महिलेला स्टाफने काढले स्टोरबाहेर, धक्कादायक आहे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडच्या हॅम्पशायरमधील 30 वर्षांची लेयेन कॅनडी (Leanne Kennedy) नावाची एक महिला बॅकलेस टॉप परिधान करून शॉपिंगसाठी गेली होती. पण स्टाफ मेंबर तिला जे म्हणाला ते ऐकूण तिला धक्काच बसला. तुम्ही परिधान केलेला ड्रेस आमच्या नियमांच्या विरोधात आहे, असे म्हणत त्या स्टाफ मेंबरने तिला दुकानाबाहेर काढले. 

असे आहे प्रकरण.. 
- लेयेन एक प्रोफेशनल सिंगर आहे. मंगळवारी ती 9 महिन्यांच्या मुलीबरोबर द रेंज (The Range) नावाच्या स्टोरमध्ये शॉपिंगसाठी गेली होती. 
- तिने सांगितले की, दुपारी दोन वाजेच्या सुमारास ती स्टोरमध्ये गेली होती. त्यावेळी तापमान जवळपास 24 डीग्री होते. 
- लेयेन म्हणाली, खरेदीसाठी फिरताना एक महिला स्टाफ माझ्या शेजारी आली आणि दुसऱ्या कस्टमरबरोबर माझ्या ड्रेसबाबत चर्चा करू लागली. 
- आधी मला वाटले ते गंमत करत असतील. त्यामुळे मी हसायला लागले. पण ती स्टाफ मेंबर मला म्हणाली, तुम्ही जो ड्रेस परिधान केला आहे तो एक तर कव्हर करा किंवा लगेचच स्टोरच्या बाहेर निघा. 
- स्टोर स्टाफच्या मते, तिचा ड्रेस खूपच उत्तेजक होता आणि तो स्टोर पॉलिसीच्या विरोधात आहे, असे तिला सांगण्यात आले. 
- लेयनचे म्हणणे होते की, मी गर्मीचा विचार करून ड्रेस परिधान केला होता. त्यात काहीही चुकीचे नव्हते. 
- लेयन म्हणाली मी डेनिम क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची ब्लॅक ट्राउझर परिधान केली होती. 
- तिने स्टोर स्टाफला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिला बाहेर काढण्यात आले. 
- या सर्व प्रकाराची तक्रार करण्याचा निर्णय लेयनने घेतला. 
- कस्टमर सर्व्हीसने तक्रारीनंतर या प्रकारासाठी तिची माफी मागितली. 
- पण त्यावेळी जे झाले त्याच्यासाठी माफ करता येणार नसल्याचे लेयन म्हणाली. लोकांसमोर माझी खिल्ली उडवणे योग्य नसल्याचे तिने सांगितले.  

पुढील स्लाइड्सवर पाहा लेयनचे इतर काही Photos.. 
बातम्या आणखी आहेत...