आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयर्नमॅन’ बनला ‘अल्ट्रामॅन’, 3 दिवसांत गाठला 517 KM चा पल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुरदर्शनच्या माध्यमातून कॅप्टन व्योमच्या भूमिकेत घराघरांमध्ये पोहोचलेल्या 51 वर्षीय अभिनेता मिलिंद सोमणने सातासमुद्रापलीकडे तिरंगा फडकविला आहे. अलीकडेच फ्लोरेडा शहरात पार पडलेली अल्ट्रामॅरेथॉन मिलिंदने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. मिलिंद सोमणने 3 दिवसांत 517 कि.मी. अंतराची मॅरेथॉन स्पर्धा पार केली. ही मॅरेथॉन स्पर्धा जगातील सर्वात कठीण स्पर्धा समजली जाते. या स्पर्धेमध्ये पोहणे, धावणे आणि सायकलिंग असे तीन टप्पे स्पर्धकाला पार करावे लागतात. ज्यामध्ये पहिल्या दिवशी 10 कि.मी. पोहणे आणि 142 कि.मी. सायकलिंग करणे, दुसऱ्या दिवशी 276 कि.मी. सायकलिंग तर तिसऱ्या दिवशी 84 कि.मी. धावावे लागते. मिलिंद सोमणव्यतिरिक्त 4 भारतीयांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत ही स्पर्धा पूर्ण केली. अभिषेक मिश्रा, कौस्तुभ रडकर, पृथ्वीराज पाटील आणि मनमध रेबा अशी या भारतीयांची नावे आहेत. विशेष म्हणजे मिलिंदने ही मॅरेथॉन अनवाणी पूर्ण केली. 2015 मध्ये मिलिंदने आयर्नमॅन चॅलेंज ही स्पर्धा 15 तास आणि 19 मिनिटांत पूर्ण केली होती. यावेळी त्याला ‘आयर्न मॅन ऑफ इंडिया’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 

पुढील स्लाईड्सवर बघा, मिलिंद सोमणची खास छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...