आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूब मेमन वाद: रितेश म्हणाला, \'सलमानने जे लिहिले, ते पूर्ण स्पष्ट होते\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- रितेश देशमुख आणि सलमान खान)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानने गेल्या रविवारी (26 जुलै) टि्वटरवर याकूब मेमनच्या फाशीचा विरोध केला होता. त्यानंतर सर्वत्र त्याच्या या टि्वटवर विरोध दर्शवला गेला. परंतु सलमानचे मित्र त्याले खुलेआम पाठिंबा देताना दिसत आहेत. पुलकित सम्राटनंतर आता अभिनेता रितेश देशमुखने सलमानच्या टि्वटला पाठिंबा दिला आहे. रितेश एका कार्यक्रमात म्हणाला, 'सलमानने जे लिहिले होते ते स्पष्ट होते. परंतु इतका विरोध पाहून त्याला टि्वट काढून टाकावे लागले. ज्या लोकांनी रिटि्वट केले त्यांना सलमानच्या म्हणण्याचा अर्थच कळाला नव्हता.'
काय आहे सलमानचे प्रकरण-
गेल्या शनिवारी (25 जुलै) 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटामधील आरोपी याकूब मेमनला फाशी देण्याच्या शिक्षेच्या विरोधात टि्वट केले होते. त्याने लिहिले होते, ‘टायगरऐवजी भाईला फाशी दिली जात आहे. अरे, टायगर कुठे आहे? भारतात टायगरचीच तर कमतरता आहे. टायगरला आणा. टायगर तुमचा भाऊ काही दिवसांत फासावर जाणार आहे. काही वक्तव्य? काही पत्ता? तुम्ही कुठे आहात, काहीतरी सांगा ना. भाऊ असा असावा? म्हणजे, याकूब मेमन. निरपराधाची हत्या म्हणजे मानवतेचा खूनच. टायगरला आणून फाशी द्या. दाखवण्यासाठी त्याच्या भावाला फाशी नको. हा टायगर म्हणजे मांजर नव्हे आणि आम्ही एका मांजरीला पकडू शकत नाही. शरीफ साहेब, जर तो (टायगर) तुमच्या देशात असेल तर कृपया सांगा. भाईला फाशी देऊ नका.’ या ट्विट्सवरून रविवारी देशभरात गदारोळ झाला होता.

वडिलांच्या सांगण्यावरून मागितली होती माफी-
वडील सलीम खान यांच्या म्हणण्यावरून सलमानने रविवारी (26 जुलै) संध्याकाळी माफी मागितली. त्याने 6 टि्वट्स करून सांगितले होते, ‘टायगर मेमनला फाशी द्यावे, असे म्हटले होते. मी त्यावर ठाम आहे. याकूबला निरपराध म्हणालो नाही, मला माझ्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला माहित आहे मुंबई बॉम्बस्फोटामध्ये अनेक लोकांनी जीव गमावले होते. परंतु एखाद्या निरपराधाचा मृत्यू संपूर्ण मानवतेचा मृत्यू आहे, असे मी म्हणालो होतो. गैरसमजाची शक्यता असल्याने ट्विट्स मागे घे, असे वडील म्हणाले, म्हणून ते मागे घेत आहे. गैरसमज झाला असेल तर बिनशर्त माफी मागत आहे.’

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, पुलकित सम्राट काय म्हणाला होता...
बातम्या आणखी आहेत...