आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिमाचलच्या या तरुणीला होती IAS होण्याची इच्छा, ऐन विशीत शिक्षण सोडून बॉलिवूडमध्ये एंट्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यामी गौतम - Divya Marathi
यामी गौतम

अॅक्ट्रेस यामी गौतमचा नुकताच बर्थडे (28 नोव्हेंबर) झाला आहे. हिमाचल प्रदेशात जन्म झालेल्या यामी गौतमला आयएएस (भारतीय प्रशासन सेवा) होण्याची इच्छा होती. त्यासाठी लॉ ऑनर्समध्ये तिचे ग्रॅज्यूएशन देखील सुरु होते. मात्र यामी गौतमला अॅक्टिंगच्या करिअरने आकर्षित केले आणि ग्रॅज्यूएशन सोडून 20 व्या वर्षी ती मुंबईत दाखल झाली. 

 

- यामी गौतमने करिअरची सुरुवात टीव्ही सीरियल्समधून केली आहे. 2008 मध्ये तिने कन्नड फिल्म  'उलासा उतसाहा'मधून रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवले. त्यानंतर काही साऊथच्या फिल्म केल्या. 


- 'विक्की डोनर'मधून यामी गौतमने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. तिची पहिलीच फिल्म सुपरहिट ठरली होती. त्यानंतर तिने टोटल सफायामध्ये काम केले. 
- बॉलिवूड स्टार अजय देवगणसोबत यामी गौतम 'अॅक्शन जॅक्सन'मध्ये झळकली होती. 
- याशिवाय यामीने 'बदलापूर'मध्येही काम केले आहे.  

 

बहिणीने केले पंजाबी फिल्ममधून डेब्यू 
- यामी गौतमचे वडील मुकेश गौतम हे पंजाबी फिल्मचे डायरेक्टर आहेत. यामीची बहीण सुरीली गौतम हिनेही मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. तिने पंजाबी फिल्ममधून डेब्यू केले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, गॉर्जियस यामी गौतमचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...