लाहोर येथे 27 सप्टेंबर 1932 रोजी जन्मलेले यश चोप्रा खिशात केवळ 200 रुपये घेऊन मुंबईत दाखल झाले होते. दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या या तरुणाने नंतर बॉलिवूडमधील सर्वात बडे प्रॉडक्शन हाऊस अशी ख्याती यशराज फिल्म्सला मिळवून दिली. दरवर्षी किमान तीन सिनेमांची निर्मिती यशराज फिल्म्स करते.
मोठे बंधू बी आर चोप्रा यांचे सहाय्यक दिग्दर्शक बनण्यापूर्वी आय एस जोहर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून यश चोप्रांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 1959 साली झळकलेल्या ‘धूल का फूल’ या सिनेमाद्वारे स्वतंत्रपणे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले.
यश चोप्रा रोमँटिक सिनेमांसाठी ओळखले जातात. ते आज आपल्यात नाहीत, मात्र कलाकृतींच्या माध्यमातून ते नेहमीच चाहत्यांच्या मनात राहणार आहेत. पाहुयात त्यांच्या सिनेमातील निवडक रोमँटिक सीन्स!
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)