आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ye Ye Yena Gade New Song Of Sai And Radhika Starer Upcoming Hindi Film Hunter

हिंदी सिनेमात मराठी गाण्याचा तडका, पाहा सई-राधिकाच्या धमाकेदार 'ये ना गडे'ची खास झलक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सई ताम्हणकर, राधिका आपटे आणि गुलशन देवाशीष या तिघांवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे.)

मुंबई : आगामी 'हंटर' या सिनेमाची बरीच चर्चा होतेय. येत्या 20 मार्च रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होतोय. या सिनेमाचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे सई ताम्हणकर आणि राधिका आपटे या दोन मराठमोळ्या अभिनेत्री या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. तर दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या हिंदी सिनेमात मराठी गाण्याचा तडका लावण्यात आला आहे. सई ताम्हणकर, राधिका आपटे आणि गुलशन देवाशीष या तिघांवर 'ये ना गडे' हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याला ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि गायिका वैशाली भैसणे-म्हाडे यांनी स्वरबद्ध केले आहे. या गाण्याचे शब्द आणि संगीत बघता सिनेमातील हे गाणे सुपर हिट ठरणार असल्याची चिन्हं आहेत.
'हंटर' या सिनेमाचे दिग्दर्शक प्रज्वल जोशी असून अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल, कृती नाखवा, रोहित चुगनी आणि केतन मेरु यांनी एकत्रित येऊन प्रोड्यूस केला आहे. या सिनेमात दोन मराठमोळ्या अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. आम्ही बोलतोय ते सई ताम्हणकर आणि राधिका आपटे यांच्याविषयी. सई आणि राधिकासह गुलशन देवाशीष आणि सागर देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका सिनेमात आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि तुम्हीही पाहा सई-राधिकाच्या धमाकेदार 'ये ना गडे'ची खास झलक...