आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्या यही अच्छे दिन है? 5 लाखांची लाच मागितल्यानंतर कॉमेडीकिंग कपिल शर्माचे मोदींना ट्विट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या (बीएमसी)अधिकाऱ्याने कार्यालयाच्या बांधकाम परवान्यासाठी लाखांची लाच मागितल्याचा आरोप ‘कॉमेडी विथ कपिल’फेम कपिल शर्माने ट्विट करून केला. हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून हेच ते अच्छे दिन?’ असा सवालही केला. ट्विटरवर ६० लाख २२ हजाराहून अधिक फॉलोअर्स असलेल्या कपिलचे हे ट्विट हजारो जणांनी लाइक करून रिट्विट केले असतानाच कपिलचे बांधकाम अनधिकृत असल्यानेच त्याने लाचेचा बनाव केल्याचा दावा बीएमसीने केला.

कपिलने मोदींनाच भ्रष्टाचाराच्या आरोपाचे ट्विट टॅग केल्यामुळे राज्य सरकार तातडीने हालले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगेच ट्विट करून दोषीविरूद्ध कठोर कारवाईची घोषणा केली. सोशल मीडियावर संतापाचा टिवटिवाट सुरू असतानाच मुंबईच्या वर्सोवा उपनगरात कपिल शर्माने सीआरझेडचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम केलेे. त्यासाठी त्याला १६ जुलै रोजी नोटीस बजावून ते तोडल्यामुळेचत्याने लाच मागितल्याचा बनाव केल्याचा दावा बीएमसीने केला.

टिका होताच नरमाई
ट्विटवरून वादळ उठल्यानंतर सायंकाळी कपिल शर्माने नरमाईची भूमिका घेत आपण कोणत्याही पक्षाला दोषी धरत नसून केवळ व्यक्तीवर आपला अाक्षेप आहे, असे ट्विट त्याने केले.

सायबर सेलमध्ये तक्रार
भाजप आमदार राम कदम यांनी सायबर सेलमध्ये कपिलविरूद्ध तक्रार केली आहे. लाच मागितल्याच्या मुद्यावर मौन धारण करू नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडले नाही, असा तक्रारीत आरोप आहे.

अनधिकृत बांधकाम तोडल्यानेच कपिल शर्माचा बनाव कपिलचेअंधेरी पश्चिमेला चार बंगलाजवळ म्हाडाचे रो हाऊस आहे. येथेच कपिलने कार्यालय थाटले आहे. एक मजली रो हाऊसचे लादी, कोबा वापरून कपिलने अनधिकृत दुसरा मजला बांधला. मागच्या १६ फूट जागेवरही अतिक्रमण केले. हे काम थांबवा केलेले तोडा म्हणून बीएमसीने १६ जुलै रोजी नोटीसही बजावली होती. ऑगस्टला त्याचे अनधिकृत बांधकाम पाडले, आले, असे सहायक आयुक्त पराग मसूरकर म्हणाले.

कपिल शर्माच्या या दोन ट्विटनी उडवली खळबळ
शुक्रवारी सकाळी ट्विट करून कपिल शर्माने बीएमसी अधिकाऱ्याने लाखांची लाच मागितल्याचा आरोप केला. ते ट्विट मागील वर्षांपासून मी १५ कोटी रुपये प्राप्तिकर भरत आहे. तरीही मला माझ्या ऑफिससाठी बीएमसीला लाख रुपयांची लागत आहे. @narendramodi (sic)’

त्यानंतर कपिलने लगेच दुसरे ट्विट करून २०१४ च्या निवडणूक प्रचार मोहिमेतील ‘अच्छे दिन आनेवाले है’ या घोषवाक्याची आठवण देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच सवाल केला.
क्यायही है आप के अच्छे दिन?’ @narendramodi

कपिलने पंतप्रधानांनाच ट्विट टॅग केले म्हटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने प्रतिसाद दिला. तो असा -

‘कपिलभाई,कृपया सर्व माहिती द्या. कठोरातील कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी मुंबई महापालिका, बृहन्मुंबई महापालिकेला दिले आहेत. आम्ही दोषीला अजिबात सोडणार नाही.’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
याट्विटवर कपिल शर्माने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि ट्विट केले :
‘खूप खूप आभारी आहे सर.... तुमच्याकडे व्यक्तिश: येऊन या विषयावर चर्चा करण्याची माझी इच्छा आहे.’
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कपिल शर्माचे ट्विट आणि त्याला मुख्यमंत्री फडणवीसांचे रिट्विट....
बातम्या आणखी आहेत...