आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परफेक्ट पोज देण्यासाठी फोटो-जर्नलिस्टला आपल्या मेकअपरुमध्ये घेऊन गेला शाहरुख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फोटो-जर्नलिस्ट योगेन शाह यांनी 90च्या दशकात शाहरुख खानचा संघर्ष पाहिला आहे आणि काळासोबत त्याचा चढता आलेखही. योगेन सांगातात, 'माझी शाहुरखसोबतची पहिली भेट हम तुम्हारे है सनम च्या सेटवर झाली होती. तेव्हा सलमानही त्याच्यासोबत होता. शाहरुखचे काही फोटो क्लिक करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. तेव्हा मी एक गोष्ट नोटीस केली की या व्यक्तीला चांगले माहित आहे की याचे कसे फोटो क्लिक केले पाहिजे. त्यांनी फार व्यवस्थित फोटोशूट केले होते.'
 
पूर्ण पेशन्ससोबत पोज देत होता शाहरुख 
- योगेन पुढे सांगतात, 'एका अवॉर्ड फंक्शनमध्ये मी उपस्थित होतो. तिथे शाहरुखला बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड मिळाला होता. ते पोज देण्यासाठी ट्रॉफी घेऊन बॅक स्टेजवर आले, तिथेही मी हजर होतो. तिथे त्यांच्यासोबत जवळपास 10 बॉडीगार्ड्स होते. त्यांच्या गराड्यात मी ट्रॉफी घेतलेले शाहरुख व्यवस्थित कॅमेरात कैद करु शकत नव्हतो. मी बॉडीगार्ड्सला थोडे अंतर ठेवून उभे राहाण्याची विनंती केली मात्र त्यांनी काही ऐकले नाही. त्यानंतर शाहरुख मला त्याच्या मेकअप रुममध्ये घेऊन गेले आणि तिथे मी त्यांचे सोलो फोटोसेशन केले. त्यांना आमचे प्रोफेशनही चांगल्या पद्धतीने कळते. त्यांनी पूर्ण पेशन्सने मला तोपर्यंत पोज दिले जोपर्यंत माझे समाधान होत नाही. यामुळे मी त्यांचा नेहमी आदर करतो. आमचे सर्वच फोटो जर्नलिस्ट यामुळेच त्यांचे दिवाने आहेत. आमच्यासाठी ते त्यांच्या फिल्मचे स्पेशल स्क्रिनिंग देखील आयोजित करतात. त्यांनी आमच्या एका सहकाऱ्याला डीएसएलआर गिफ्ट केले होते, आता ते नाहीत. याशिवाय ते चॅरिटीही करतात. आजच्या काळात कोणताही इंडस्ट्रियलिस्ट किंवा क्रिकेटर यांचा पोज मिळणे फार दुर्मिळ झाले आहे. मात्र शाहरुखबाबत असे अजून नाही.'
बातम्या आणखी आहेत...