आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळी सागरिका आणि झहीर यांचा साखरपुडा, युवीच्या लग्नात सर्वांना कळले होते दोघांचे प्रेम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंगेजमेंट रिंग दाखवताना सागरिका. - Divya Marathi
एंगेजमेंट रिंग दाखवताना सागरिका.
एंटरटेनमेंट डेस्क - आयपीएलमध्ये दिल्ली डेअर डेव्हील्सचा कर्णधार आणि भारताचा स्टार क्रिकेटपटू झहीर खानने मराठमोळी अॅक्ट्रेस सागरिका घाटगे बरोबर साखरपुडा केल्याची घोषणा केली आहे. झहीरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला, त्यात सागरिका एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसत आहे. 

शेअर केला स्पेशल मॅसेज 
- झहीरने या फोटोबरोबर लिहिले की, आपल्या बायकोच्या निवडीवर कधीही हसू नका, कारण तुम्हालाही तिनेच निवडलेले आहे. पार्टनर्स फॉर लाइफ.'' असे लिहित त्याने सागरिका टॅग केले आणि engagement ला हॅशटॅगही केले. झहीरने हा पोटो शेअर करताच सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षा व्हायला सुरुवात झाली आहे. झहीर या वर्षा अखेरीपर्यंत सागरिकाबरोबर लग्न करण्याची शक्यता आहे. 

मित्रांद्वारे झाली ओळख 
रिपोर्ट्सनुसार सागरिका आणि झहीर एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एकमेकांना भेटले होते. असे समजले जाते की, माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचा मुलगा आणि बॉलीवूड अॅक्टर अंगद बेदी याने दोघांची भेट घडवली. त्यानंतर दोघे डेट करू लागले.  

चक दे इंडियाद्वारे झाली फेमस 
सागरिका ही शाहरूख खानच्या 'चक दे इंडिया' चित्रपटानंतर प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर तिला चक दे गर्ल असे म्हणू लागले होते. चित्रपटांत येण्यापूर्वी ती अॅथलिट होती. सागरिकाने आतापर्यंत 5 हिंदी, एक मराठी आणि एक पंजाबी चित्रपट केला आहे. 

युवराज सिंहच्या लग्नात समोर आले अफेयर
झहीर आणि सागरिका डेट करत असल्याचे सर्वात आधी युवराज सिंहच्या लग्नाच्या वेळी समोर आले होते. या लग्नात दोघे जोडीने उपस्थित होते. त्यानंतर अनेक ठिकाणी ते दोघे एकमेकांबरोबर स्पॉट झाले. पण त्यांनी त्यांच्या नात्याबाबत काहीही माहिती दिली नाही किंवा दुजोरा दिला नव्हता. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, झहीर आणि सागरिका यांचे फोटो आणि जाणून घ्या काही रंजक माहिती... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...