आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या हीरोईनने बोल्ड सीन्समध्ये ओलांडल्या मर्यादा, गाणे नव्हे वाटेल एखादी कंडोम अॅड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान आणि अली फजल यांच्यावर चित्रीत झालेले 'प्यार मांगा है तुम्ही से' हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. बॉलिवूडच्या या क्लासिक गाण्याचा रिमेक ओरिजिनल गाण्यापेक्षा अगदी वेगळा आहे. या गाण्यात स्मूच आणि लव्ह मेकिंग सीन्सचा भडीमार आहे. हा रिमेक लोकांना पसंत पडेल की नाही हे लवकरच कळेल, मात्र या गाण्यातून झरीन आणि अलीला मात्र नक्कीच पब्लिसिटी मिळणारेय.
या गाण्याच्या सुरुवातीला हे दोघे विविध ठिकाणी किस करताना दिसतात आणि पुढे गाण्यात दोघांवर भरपूर इंटीमेट सीन्स चित्रीत करण्यात आले आहे. हे गाणे बघता आजवरचे हे सर्वात हॉट आणि बोल्ड रिमेक गाणे ठरणारेय.

यापूर्वी झरीनने 'हेट स्टोरी ३' या सिनेमात भरपूर बोल्ड सीन्स दिले होते. मात्र या गाण्यात ती बोल्डनेसमध्ये एक पाऊल पुढे गेल्याचे दिसून येते. हे गाणे बघून झरीन आणि अलीने एखाद्या कंडोम अॅडसाठीच हे बोल्ड सीन्स दिलेत की काय असा प्रश्न उपस्थित होतो.
'प्यार मांगा है तुम्ही से' हे ओरिजिनल गाणे प्रसिद्ध पार्श्वगायक किशोर कुमार यांच्या आवाजातील असून १९७८ सालच्या 'कॉलेज गर्ल'मधील आहे. या गाण्याचा रिमेकमध्ये अरमान मलिक आणि नीती मोहन यांनी आपला आवाज दिला आहे. तर संगीत अभिजीत विज्ञानीने दिले आहे. या गाण्याचे शूटिंग जॉर्जियामध्ये झाले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, झरीन आणि अलीनने या गाण्यात कशा मर्यादा
ओलांडल्या आहेत, सोबतच शेवटच्या स्लाईडमध्ये गाण्याचा व्हिडिओ बघायला विसरु नका.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...