आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Zareen Khan Weight Loss Transformation And Rejected 1 Cr Offer To Promote Weight Loss Pill

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

100 हून 57Kg झाली ही अॅक्ट्रेस, ठोकरली होती 1 कोटींच्या अॅडची ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडमध्ये झरीन खानची आठवी फिल्म 'अक्सर-2' रिलीज झाली आहे. या फिल्ममध्ये तिने गौतम रोडे आणि अभिनव शुक्लासोबत बरेच बोल्ड सीन्स दिले आहे. झरीनच्या चित्रपट कारकिर्दीतील प्रवासाविषयी बोलायचे झाले तर, सर्वांनाच आश्चर्य वाटते. तिने फिल्मसाठी स्वतःला फार मोठ्या प्रामाणात ट्रांसफॉर्म केले आहे. एक काळ होता, जेव्हा तिचे वजन 100 किलो होते. तिच्या लठ्ठपणामुळे तिला तिची डेब्यू फिल्म वीरमध्ये फार टोमणेही ऐकावेल लागले होते. 
 
 असे केले 100 चे 57 Kg. 
 - काही दिवसांपूर्वी झरीनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक जुना फोटो शेअर केला. हा फोटो ती जेव्हा 9-10 वी होती तेव्हाचा आहे. 
 - झरीनचे वजन तेव्हा 100 किलो होते, तिने पोस्टमध्ये लिहिले की तिच्या लठ्ठपणामुळे लोक तिला खूप टोमणे मारायचे. 
 - तिने पोस्टमध्ये लिहिल्यानुसार टीनएजमध्ये ती जंक फुडवर भरपूर ताव मारायची. तेव्हा तिला अॅक्ट्रेस नाही तर डॉक्टर होण्याची इच्छा होती. 
 - जेव्हा तिचे शरीर अवाढव्य वाढायला लागले तेव्हा तिच्या लक्षात आले की अॅक्टर असेल किंवा डॉक्टर कोणत्याही फिल्डसाठी तिचे शरीर योग्य वाटत नव्हते. तेव्हा तिने वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरु केले. 
 - वर्कआऊट, जिम, लिमिटेड डाएट प्लॅन हे सर्व केल्यानंतर बऱ्याच काळाने तिचे वजन 43 किलोंनी कमी झाले होते. 
 - आता फिट कसे राहावे हे झरीनला चांगले कळाले आहे. ती फिटनेस ट्रेनर यास्मीर कराचीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली वर्कआऊट करते आणि आता तिचे वजन 57 किलो झाले आहे.

 

जेव्हा झरीनने नाकारली 1 कोटींची ऑफर 
- झरीनने सांगितले की तिला आता लठ्ठपणामुळे हैरान महिलांसाठी इन्स्प्रेशन बननण्याची इच्छा आहे. 
- झरीनने एका मुलाखतीत सांगितले होते, की तिला एकदा वजन कमी करण्याच्या एका औषध कंपनीने जाहिरातीसाठी 1 कोटींची ऑफर दिली होती. मात्र तिने ही ऑफर नाकारली होती. 
- तिने सांगितले होते, की मी अशी कोणतीही अॅड करणार नाही ज्यावर माझाच विश्वास नाही. 
- झरीनने सांगितल्यानुसार, तिने तिची बॉडी फॅट टू फिट करण्यासाठी जिममध्ये कित्येक तास घाम गाळला आहे. तेव्हा कुठे अशी फिगर मिळाली आहे. वजन कमी करण्यासाठी दुसरा कोणताही शॉर्टकट नसल्याचेही झरीनने म्हटले. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, झरीन खानचे निवडक फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...