बुधवारी (18 नोव्हेंबर) झालेल्या मुलाखतीदरम्यान झरीन खान आणि डेजी शाह
मुंबई- दिग्दर्शक अमित पंड्याचा 'हेट स्टोरी 3' रिलीजसाठी तयार आहे. या सिनेमात सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या दोन अभिनेत्री डेजी शाह (जय हो फेम) आणि झरीन खान (वीर फेम) बोल्ड अवतारात दिसणार आहेत. डेजी शाहने यापूर्वीच स्पष्टीकरण दिले होते, की तिला हा सिनेमा करण्यासाठी सलमाननेच सल्ला दिला होता. आता झरीन खानला हा सिनेमा करण्यासाठी कुणी सल्ला दिला असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. झरीनच्या सांगण्यानुसार, तिच्या आईने तिला हा सिनेमा करण्यासाठी प्रेरित केले आहे. एका प्रतिष्ठीत वेबसाइटनुसार, झरीन या सिनेमाविषयी गोंधळात होती. नंतर तिने याविषयी तिच्या आईसोबत बातचीत केली. झरीनच्या आईने तिला हा सिनेमा करण्यासाठी सल्ला दिला.
काय म्हणाली झरीनची आई-
झरीनच्या सांगण्यानुसार, 'मी प्रत्येक गोष्टीसाठी आईचा सल्ला घेते. या सिनेमाविषयीसुध्दा मी असेच केले. तिने सांगितले, की हा सिनेमा करण्यास काय हरकत आहे. आजकाल प्रत्येक सिनेमात असे सीन्स होतातच. आईच्या अशा बोलण्याने माझ्यातील आत्मविश्वास वाढला. मी हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला.' तिच्या सांगण्यानुसार, की तिच्या आईचा असा विचार करणे योग्य होते, मात्र ज्याप्रकारे 'हेट स्टोरी 3'मध्ये सीन्स टाकले आहेत, ते बोल्ड आहेत.
लोकांचा दृष्टीकोन बदलला-
बुधवारी (18 नोव्हेंबर) झरीन खान, करण सिंह ग्रोवर आणि डेजी शाहने या सिनेमाविषयी माध्यमांशी चर्चा केली. यादरम्यान झरीनने सांगितले, की सिनेमात सिया दीवानचे पात्र साकारत आहे. ती शरमन जोशीची पत्नी आहे. सोबतच झरीनने असेही सांगितले, की ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यांच्याविषयीचा लोकांचा दृष्टीकोन बदलला. आतापर्यंत लोकांनी त्यांच्याविषयी एकच परसेप्शन बनवलेले होते. त्याला सिनेमाच्या ट्रेलर मोडित काढले.
आपल्याविषयी लोकांच्या बदलत्या भूमिकेविषयी झरीन आनंदी आहे.
डेजी म्हणाली मी शोपीस नाहीये-
डेजीने माध्यमांना आपल्या भूमिकेविषयी सांगितले, की ती या सिनेमात शोपीससारखी नाहीये. बुधवारी एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले, 'मला वाटते, की माझी भूमिका केवळ मनोरंजन करण्यासाठी नाहीये. सिनेमात मी शोपीस नाहीये. माझी भूमिका महत्वाची आहे. जर ही भूमिका महत्वाची नसते तर सिनेमाच्या पोस्टरवर मला दाखवले नसते.' डेजीच्या सांगण्यानुसार, सिनेमात तिने काव्या शर्मा नावाच्या बिझनेस वुमेनचे पात्र साकारले आहे, ती आपल्या बिझनेस वाचवण्यासाठी कोणत्याही मर्यादा ओलांडायला तयार आहे.
सलमानला आवडला ट्रेलर-
बुधवारी मुलाखतीदरम्यान झरीनने सांगितले, 'बिग बॉस'मध्ये सलमानने उल्लेख केला होता, की त्याला ट्रेलर आवडला आहे. तसेच डेजी शाहने एका गोष्टीवर जोर दिला, की ज्या लोकांना वाटत नाही, की सलमानने तिला सिनेमा करण्यासाठी प्रेरित केले नाहीये, त्यांना सांगावस वाटत, की स्वत: सलमानने बिग बॉसमध्ये याचा स्वीकार केला आहे. तिने सांगितले, 'मला माहित नाही, शोमध्ये काय दाखवण्यात आले. परंतु सलमानने सांगितले होते, की मी माझ्या दोन मुली या सिनेमासाठी सोपवल्या आहेत.'
4 डिसेंबरला रिलीज होणार सिनेमा-
'हेट स्टोरी 3' येत्या 4 डिसेंबरला रिलीज होणार आहे. सिनेमात शरमन जोशी आणि करण सिंह ग्रोवर महत्वाच्या भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुलाखतीदरम्यानचे झरीन, करण आणि डेजीचे काही फोटो...