आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Celebs Perform At IIFA Awards 2018 ​ IIFA 2018: वरुणने \'तम्मा तम्मा..\', तर रणबीरने दिला \'बलम पिचकारी..\'वर धमाकेदार परफॉर्मन्स

​ IIFA 2018: वरुणने \'तम्मा तम्मा..\', तर रणबीरने दिला \'बलम पिचकारी..\'वर धमाकेदार परफॉर्मन्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉकः बँकॉकमध्ये रविवारी रात्री पार पडलेल्या  IIFA अवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटींनी एकाहून एक धमाकेदार परफॉर्मन्स दिले. अभिनेता वरुण धवनने 'बद्रीनाथ की दुल्हनियां' या चित्रपटातील 'तम्मा तम्मा..' वर पॉवर पॅक परफॉर्मन्स दिला. तर अभिनेता रणबीर कपूर 'ये जवानी है दीवानी' या चित्रपटातील 'बलम पिचकारी..' या गाण्यावर थिरकला. बॉबी देओलने यूलिया वंतूरसोबत 'रेस 3' या चित्रपटातील 'पार्टी चले ऑल नाइट ..'  या गाण्यावर डान्स केला. नृत्य करता करता बॉबी देओलने मंचावर त्याचा ब्लॅक कलरचा कोट काढून टाकला.  या सेलिब्रिटींसोबतच अर्जुन कपूर आणि कृती सेनन यांनी 'तूने मारी एंट्री..' या गाण्यावर परफॉर्म केले. तर श्रद्धा कपूरसुद्धा तिच्या गाजलेल्या 'हम्मा हम्मा..' या गाण्यावर थिरकली. 

 

बातम्या आणखी आहेत...