आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: जया बच्चन यांच्या बर्थडे सेलिब्रेशनला सेलेब्सची मांदियाळी, ऐश्वर्या मात्र गैरहजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांनी नुकतीच वयाची सत्तरी ओलांडली. 9 एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस होता. यानिमित्ताने बच्चन कुटुंबियांनी एका छोटेखानी पार्टीचं आयोजन केलं होतं. सेलिब्रिटी डिझायनर्स अबू जानी आणि संदीप खोसला यांच्यासह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी जया बच्चन यांना बर्थडे विश करायला पोहोचले होते. या पार्टीला करण जोहर, हिरू जोहर, रिमा जैन, सोनम कपूर, सोनाली बेंद्रे, रिया कपूर, गोल्डी बहल, अमृता सिंग, सारा अली खान यांच्यासह अनेक जण पोहोचले होते.

 

श्वेता बच्चनची उपस्थिती, ऐश्वर्या-आराध्या मात्र दिसल्या नाहीत...

- जया बच्चन यांच्या बर्थडे पार्टीचे काही इनसाइड फोटोज समोर आले आहेत. या फोटोजमध्ये त्यांची थोरली लेक श्वेता बच्चन नंदा दिसतेय. 

- पण जया बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन एकाही छायाचित्रात दिसल्या नाहीत. यावरुन बर्थडे सेलिब्रेशनला ऐश्वर्या आणि आराध्या उपस्थित नसल्याची चर्चा रंगत आहे. 

 

तीन लेअरचा खास केक...

- जया बच्चन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बंगल्यावर खास सजावट करण्यात आली होती. 

- शिवाय जया बच्चन यांच्यासाठी खास केक मागवण्यात आला होता. तीन लेअरचा खास केक जया बच्चन यांनी कापला. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, जया बच्चन यांच्या बर्थडे सेलिब्रेशनला पोहोचलेल्या सेलेब्सची आणि पार्टीची इनसाइड छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...