आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • सोनम कपूर संगीत सेरेमनी, Sonam Kapoor First Look Before Sangeet Ceremony

अप्सरा अवतरली... संगीत सेरेमनीत असा होता सोनमचा लूक, राणीसह पोहोचले हे सेलेब्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री सोनम कपूर 8 मे रोजी दिल्ली बेस्ड बिझनेसमन आनंद आहुजासोबत बोहल्यावर चढत आहे. सोमवारी मुंबईतील  बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थित सनटेक सिग्नेचर आइलॅण येथे सोनमची संगीत सेरेमनी पार पडली. या कार्यक्रमासाठी सोनमने ऑफ व्हाइट कलरच्या डिझायनर लहेंग्याची निवड केली होती. या पोशाखात सोनम अतिशय सुंदर दिसली. झुमके आणि चोकर नेकलेसने सोनमने तिचा हा लूक पूर्ण केला. सोबतच तिने मांग टीकाही लावला होता. तिचा हा डिझायनर लहेंगा प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केला होता. संगीत सेरेमनीच्या कव्हरेजसाठी कपूर कुटुंबीयांनी मीडियासाठी खास व्यवस्था केली होती. 


रविवारी लागली सोनमच्या हातावर मेंदी...
संगीत सेरेमनीपूर्वी रविवारी सोनमच्या हातावर मेंदी सजली. अनिल कपूर यांच्या राहत्या घरीच मेंदीचा कार्यक्रम पार पडला. मेंदी लागल्यानंतर नववधू सोनम भावी पती आनंद आहुजासोबत थिरकताना दिसली. तर वडील अनिल कपूर आणि आई सुनिता यांनीही यावेळी मनसोक्त ताल धरला. 


पुढील स्लाईड्सवर बघुयात, सोनमच्या संगीत सेरेमनीचे निवडक फोटोज...   

बातम्या आणखी आहेत...