आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल झाला सोनम कपूरचा डान्स व्हिडिओ, ठुमके लावताना दिसली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड प्रसिद्ध फॅशन डिझायनर संदीप खोसला यांची भाची सौदामिनी मट्टू सिद्धार्थसोबत शनिवारी विवाहबद्ध झाली. या लग्नाला अभिनेत्री सोनम कपूर हिने उपस्थिती लावली होती. लग्नातील सोनमचा एक व्हिडिओ समोर आले आहे, यामध्ये ती अबू जानी यांच्यासोबत डान्स करताना दिसतेय. दोघांनीही 'प्रेम रतन धर पायो' या चित्रपटातील शीर्षक गीतावर ताल धरला होता. सोनमचा डान्स बघून जया आणि श्वेता बच्चन यांनी तिच्यावर नोटादेखील फेकल्या. लग्नात सोनम तिची धाकटी बहीण रिया, आई सुनीता, काका संजय कपूर आणि काकू महीप संधूसोबत सहभागी झाली होती. सोनम सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. येत्या 7-8 मे रोजी बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत सोनम मुंबईत विवाहबद्ध होणार आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, लग्नात पोहोचलेल्या सोनम कपूरच्या कुटुंबीयांची छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...