Home | Party | Bhumi Pednekar Birthday, Bhumi Pednekar Birthday Party Celebs Enjoy

Birthdayला ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसली भूमी पेडनेकर, बॉयफ्रेंडसोबत पोहोचली 'बेफिक्रे' गर्ल वाणी कपूर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 19, 2018, 11:28 AM IST

अभिनेत्री भूमी पेडनेकर मंगळवारी(18 जुलै) 29 वर्षांची झाली आहे. तिने फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत मुंबई येथील एका रेस्तरॉमध्य

 • मुंबई : अभिनेत्री भूमी पेडनेकर मंगळवारी(18 जुलै) 29 वर्षांची झाली आहे. तिने फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत मुंबई येथील एका रेस्तरॉमध्ये वाढदिवस सेलिब्रेट केला. या वेळी भूमी ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. तिने मीडिया फोटोग्राफर्सला पोजही दिल्या. भूमीचा पोज देतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. बर्थडे पार्टीमध्ये 'बेफिक्रे' चित्रपटातील अभिनेत्री वाणी कपूर बॉयफ्रेंडच्या हातात हात घालून पोहोचली. पार्टीमध्ये भूमीची आई सुमित्रा हुडा पेडनेकर, करण जोहर, वरुण धवन, डायरेक्टर शशांक खेतान, आनंद एल राय, आदर जैनसोबतच अनेक सेलेब्स स्पॉट झाले.
  - भूमी पेडनेकरने जवळपास तीन वर्षांपुर्वी 'दम लगा के हईशा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात भूमीने लठ्ठ महिलेची भूमिका साकारली होती. यासाठी तिने 20 किलो वजन वाढवून 89 किलो केले होते. यानंतर ती टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटात दिसली. या चित्रपटात तिचा लूक पहिल्या चित्रपटापेक्षा एकदम वेगळा होता. 'दम लगा के हईशा' च्या शूटिंगनंतर तिने जवळपास 27 किले वजन कमी केले होते.
  - एका मुलाखती दरम्यान भूमिने सांगितले होते की, 'मला 27 किलो वजन कमी करण्यासाठी 3 वर्षे लागले. मुलं आणि मुलींचे बॉडी मेकेनिज्म वेगळे असते. मुलांसाठी वजन कमी करणे किंवा वाढवणे खुप सोपे असते. परंतू मला ही प्रोसीजर खुप टफ वाटली. प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेनुसार वजन कमी किंवा जास्त करत असते.'
  - भूमीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती 'टॉयलेट एक प्रेमकथा', 'शुभ मंगल सावधान', 'लस्ट स्टोरिज' मध्ये दिसली. 'सोन चिरैया' हा तिचा आगामी चित्रपट आहे.


  पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा भूमी पेडनेकरचे बर्थडे पार्टीचे फोटोज...

 • Bhumi Pednekar Birthday, Bhumi Pednekar Birthday Party Celebs Enjoy
  भूमी पेडनेकर
 • Bhumi Pednekar Birthday, Bhumi Pednekar Birthday Party Celebs Enjoy
  करण जोहर आणि वरुण धवन
 • Bhumi Pednekar Birthday, Bhumi Pednekar Birthday Party Celebs Enjoy
  वरुण धवन आणि शशांक खेतान

Trending