आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख, आमिरपासून ते फरहानपर्यंत, कॅनडाच्या पंतप्रधानांच्या भेटीला पोहोचले बॉलिवूड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या भारत भेटीवर असलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचे कलाविश्वातून स्वागत करण्यात आले. मंगळवारी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ट्रुडो यांच्या भेटीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी बॉलिवूडमधून अनेक सेलिब्रिटींनी ट्रुडो आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अभिनेता शाहरुख खान, आमिर खान, अनुपम खेर, फरहान अख्तर यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते. शाहरुख खानने ट्रुडो यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. या भेटीचे फोटोज सोशल मीडियावर समोर आले आहेत. विशेष म्हणजे यावेळी ट्रुडो आणि त्यांच्या पत्नी, मुले पारंपरिक भारतीय पोशाखात दिसले. 


पुढील स्लाईड्सवर बघा, ट्रुडो यांच्या भेटीला पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे... 

 

बातम्या आणखी आहेत...