आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Engagement Ceremony: मुकेश अंबानींच्या मुलाच्या साखरपुड्याला जमली बी-टाऊन स्टार्सची मांदियाळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकाश आणि श्लोका यांच्या साखरपुड्याला गौरी-शाहरुख, आलिया भट,रणबीर कपूर यांनी हजेरी लावली. इनसेटमध्ये एंटिलामध्ये दाखल झालेली श्लोका मेहता आणि अंबानी कुटुंबीय - Divya Marathi
आकाश आणि श्लोका यांच्या साखरपुड्याला गौरी-शाहरुख, आलिया भट,रणबीर कपूर यांनी हजेरी लावली. इनसेटमध्ये एंटिलामध्ये दाखल झालेली श्लोका मेहता आणि अंबानी कुटुंबीय

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे थोरले चिरंजीव आकाश अंबानी आणि हिरे व्यापारी रसैल मेहता यांची धाकटी कन्या श्लोका मेहता यांचा आज (28 जून) साखरपुडा असून बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी या कार्यक्रमाला जमली आहे. अभिनेता शाहरुख खान पत्नी गौरी खानसोबत एंटिलामध्ये पोहोचला आहे. याशिवाय आलिया भट, रणबीर कपूर, विधू विनोद चोप्रा आणि त्यांची पत्नी, अयान मुखर्जी, करण जोहरसह अनेक सेलिब्रिटी या साखरपुड्याला उपस्थित आहेत. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसोबत याठिकाणी उपस्थित आहे. 

 

श्लोका आणि तिच्या कुटुंबीयांना रिसिव्ह करायला मुकेश अंबानी स्वतः होते हजर...

श्लोका आणि आकाश अंबानी यांचा साखरपुडा अंबानींच्या प्रसिद्ध एंटिला या घरी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्लोका आणि तिचे कुटुंबीय एंटिलामध्ये पोहचल्यानंतर मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी टीना अंबानी, मुलगा आकाश आणि अनंत, मुलगी इशा गेटवर त्यांना रिसिव्ह करण्यासाठी हजर होते.

 

पारंपरिक रुपात अतिशय सुंदर दिसली आलिया...

अभिनेत्री आलिया भट हिने गुलाबी रंगाची डिझायनर साडी परिधान केली असून पारंपरिक रुपात तिचे सौंदर्य अधिकच खुललेले दिसत आहे. तर तिचा तथाकथित बॉयफ्रेंड आणि अभिनेता रणबीर कपूरदेखील कुर्ता-पायजामात अतिशय हॅण्डसम दिसतोय. तर अभिनेता शाहरुख खान ब्लॅक कलरच्या सूटमध्ये दिसला. गौरीने डिझायनर गाऊन कॅरी केला. करण जोहरने शेरवानीला पसंती दिली.  

 

27 जूनला झाली श्लोकाची मेंदी सेरेमनी... प्रियांका होती हजर... 

27 जून रोजी श्लोकाची मेंदी सेरेमनी झाली. मेंदी आणि प्री एंगेजमेंट सेरेमनीला अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिचा तथाकथित बॉयफ्रेंड निक जोनाससोबत हजर होती.  प्रियांकाने इन्स्टाग्रामवर मेंदी फंक्शनचे काही फोटोज पोस्ट केले आहेत. अंबानींचे आलिशान घर 'एंटीलिया'मध्ये मेंदी फंक्शनचे आयोजन करण्यात आले होते.

 

मार्च महिन्यात गोव्यात झाली होती प्री एंगेजमेंट सेरेमनी
- आकाश आणि श्लोकाची प्री-एंगेजमेंट सेरेमनी 24 मार्च रोजी गोव्यात झाली होती. 'ताज एक्जोटिका रिसोर्ट अॅण्ड स्पा'मध्ये ही सेरेमनी झाली होती. फुलांनी सजवलेल्या एका स्टेजवर आठ मिनिटांचे फोटोशूट झाले होते. यात आकाशने श्लोका हिला प्रपोज केले होते.
- नंतर डान्स पार्टी झाली होती. त्यात आकाश-श्लोकासह नातेवाईक-मित्रांनी डान्स केला होता.

शिक्षणही सोबतच...

- मुकेश आणि नीता अंबानी यांनी तीन मुले आहेत. त्यात आकाश आणि ईशा जुळे मुले असून अनंत हा धाकटा आहे.
- श्लोका ही हिर्‍यांचे व्यापारी रसैल मेहता यांची धाकटी कन्या आहे. अंबानी आणि मेहता परिवार एकमेकांचा चांगल्यापैकी ओळखतात.

- श्लोका आणि आकाशने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सोबत शिक्षण घेतले आहे.
- आकाशने अमेरिकेतील ब्राउन यूनियव्हर्सिटीमधून इकोनॉमिक्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... आकाश आणि श्लोकाच्या साखरपुड्याला पोहोचलेल्या बॉलिवूड स्टार्सची खास छायाचित्रे...

 

बातम्या आणखी आहेत...