आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मुंबईः निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने रविवारी रात्री त्याच्या मुंबईतील राहत्या घरी एक पार्टी होस्ट केली होती. ख्रिसमसच्या निमित्ताने आयोजित या पार्टीत अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा मामा अभिषेक आणि मामी ऐश्वर्यासोबत पोहोचली. तर दुसरीकडे शाहरुख खानसह त्याचा मुलगा आर्यन खान या पार्टीत सहभागी झाला. याशिवाय संजय कपूरची मुलगी शनाया कपूर, आलिया भट, लीसा हेडन आणि तिची बहीण जुलिया हेडन, सोनाक्षी सिन्हा, मलायका अरोरा, रणवीर कपूर, चंकी पांडे, अमृता अरोरा, फरहान अख्तर, झोया अख्तरसह अनेक सेलेब्स या पार्टीत पोहोचले होते.
मीडियाला बघून शाहरुखच्या मुलाने लपवला चेहरा..
- आर्यन त्याचे वडील शाहरुखसोबत पार्टीत पोहोचला. यावेळी उपस्थित फोटोग्राफर त्याचे फोटो क्लिक करत असताना त्याने हाताने आपला चेहरा लपवला. मात्र तरीदेखील त्याचे काही फोटोज कॅमे-यात कैद झाले.
मुलांच्या जन्मानंतर करण जोहरचा पहिला ख्रिसमस...
- मुलगा यश आणि मुलगी जुहीच्या जन्मानंतर करण जोहरचे हे पहिले ख्रिसमस सेलिब्रेश आहेत.
- याचवर्षी मार्च महिन्यात करण सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांचा पिता झाला.
- करण या पार्टीचे बॉलिवूडच्या प्रत्येक दिग्गज कलाकाराला आमंत्रण पाठवले होते. पण अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार अनिल कपूर आणि आमिर खान सह अनेकांनी पार्टीला दांडी मारली.
पुढील स्लाईड्सवर बघा, करणच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.