आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dhadak Screening:आईसोबत पोहोचला ईशान खट्टर, मुलगी खुशीला घेऊन पोहोचले बोनी, सोनमही पोहोचली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई निलिमा अजीमसोबत ईशान खट्टर, सोनम कपूर आणि बोनी कपूर धाकटी मुलगी खुशीसोबत - Divya Marathi
आई निलिमा अजीमसोबत ईशान खट्टर, सोनम कपूर आणि बोनी कपूर धाकटी मुलगी खुशीसोबत

मुंबई: रविवारी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर चित्रपट 'धडक'ची स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. स्क्रीनिंगमध्ये ईशान खट्टर आई नीलिमा अजीमसोबत चित्रपट पाहण्यासाठी पोहोचला. तर जान्हवी कपूरचे कुटूंब वडील बोनी कपूर, बहीण खुशी कपूर, अनिल कपूर, सुनीता कपूर, संजय कपूर, महीप संधू, शनाया कपूर, अनन्या पांडेही पोहोचले. यासोबतच करण जोहर हे आई हीरुसोबत पोहोचले. वरुण धवन, मोहित मारवाह, शालिनी कपूरही यावेळी उपस्थित होते. जान्हवीच्या डेब्यू चित्रपटाला सपोर्ट करण्यासाठी संपुर्ण कपूर कुटूंबीय पोहोचले. परंतू ईशानच्या कुटूंबातून शाहिद कपूर आणि मीरा राजपूत आले नाही. फक्त आई नीलिमा पोहोचल्या. 


बॉयफ्रेंडसोबत पोहोचली रिया कपूर तर पतीशिवाय पोहोचली सोनम 
- बहीण जान्हवी कपूरच्या 'धडक' चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये सोनम कपूर एकटीच पोहोचली.
- तर रिया कपूर बॉयफ्रेंड करण बूलानीसोबत दिसली. करण फिल्म डायरेक्टर आहे आणि त्याने 'आयशा' आणि 'वेकअप सिड'मध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. 
- करणने अनेक चित्रपट आणि शोजमध्ये डायरेक्शन, प्रोडक्शन आणि डबिंगचे काम केले आहे. 2010 मध्ये आलेल्या 'आयशा' चित्रपटात एकत्र काम करताना रिया आणि करणचे अफेअर सुरु झाले होते. 
- स्क्रीनिंगमध्ये अर्जुन कपूर उपस्थित नव्हता. तो सध्या लंडनमध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा धडक चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...
 

बातम्या आणखी आहेत...