आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राजी'ची सक्सेस पार्टी : वडील गुलजार यांच्यामुळे पाणावले मेघना गुलजार यांचे डोळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: आलिया भट आणि विकी कौशल स्टारर 'राजी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. देशभक्तीवर आधारित या चित्रपटाने आतापर्यंत 51.24 कोटींची कमाई केली आहे. यानिमित्ताने मुंबईत बुधवारी चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ‘राजी’ हा चित्रपट राखी आणि गुलजार यांची कन्या मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे. या पार्टीत मेघना गुलजार यांच्या डोळ्यात मात्र अश्रू दिसून आले.


काय घडले नेमके.. 
या पार्टीत मेघना यांचे वडील आणि प्रसिद्ध गीतकार-दिग्दर्शक गुलजार उपस्थित होते.  पार्टीत आपल्या मुलीचे गुलजार यांनी तोंड भरुन कौतुक केले. त्यावेळी मेघना यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ‘मेघनाने केलेला हा चित्रपट उत्कृष्ट असून ती माझी मुलगी असल्याचे मला समाधान आहे’.  गुलजार यांचे हे शब्द ऐकताच मेघना यांना स्टेजवरच रडू कोसळले. 


पुढे ते म्हणाले, ‘चित्रपटांचा दर्जा टिकवण्यासाठी ही पिढी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. खरंतर ही फार आनंदाची गोष्ट आहे. अशा चित्रपटांच्या निर्मितीमुळेच चित्रपटांचा दर्जा टिकून राहणार आहे. अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी जे प्रयत्नशील आहेत अशा दिग्दर्शक, निर्मात्यांचा हात धरुन त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी मदत करावी.’
पार्टीत आलिया भट, विक्की कौशल, मेघना गुलजार, सोनी राजदान, शंकर महादेवन, रजत कपूर, अमृता खानविलकरसह बरेच सेेलेब्स सहभागी झाले होते. पार्टीत आलिया यलो कलरच्या लहेंग्यात तर अमृता डिझायनर साडीत दिसली.  


पुढील स्लाईड्सवर बघा, पार्टीचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...