आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hema Malini Daughter Esha Deol Celebrate First Mothers Day With Six Month Old Child Radhya

हेमा मालिनीच्या नातीने सेलिब्रेट केला पहिला मदर्स डे, आई ईशासोबत कापला केक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री हेमा मालिनीची नात आणि ईशा देओलची मुलगी राध्या 6 महिन्यांची झाली आहे. ईशाने मुलीसोबत नुकताच पहिला मदर्स सेलिब्रेट केला. यावेळी राध्या ईशासोबत केक कापताना दिसली. यासोबतच ईशाच्या इतर मैत्रिणी त्यांच्या मुलांसोबत दिसल्या. सेलिब्रेशनचे फोटोज ईशाने सोशल मीडियावर अपलोड केले आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की,  “Esha’s 1st Mother’s Day with all the mommies and babies in the house!!! #radhyatakhtani”. राध्याचा जन्म 23 ऑक्टोबर, 2017 ला झाला होता.

 

जून 2012 मध्ये ईशाने बिझनेसमनसोबत केले लग्न
- ईशा देओलने 29 जून, 2012 मध्ये बिझनेसमन भरत तख्तानीसोबत मुंबईच्या इस्कॉन मंदिरात लग्न केले होते.
- ईशाला 2002 मध्ये आलेली डेब्यू फिल्म 'कोई मेरे दिल से पूझे' साठी फिल्मफेअरचा बेस्ड डेब्यू अवॉर्ड देण्यात आला होता. परंतू यानंतर तिचे करिअर पुढे जाऊ शकले नाही.
- हेमा आजही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावतेय. तर ईशाचे करिअर 25 चित्रपटांमध्ये संपले. 
- ईशा शेवटच्यावेळी 2015 मध्ये आलेल्या 'किल देम यंग' मध्ये दिसली होती. 

 

कोण आहे भरत तख्तानी 
- भरत तख्तानी बांद्रा येथील बिझनेसमन आहे. सिंधी कुटूंबात जन्मलेल्या भरतचे वडील विजय तख्तानी स्वतः बिझनेसमन आहेत.
- भरतचा लहान भाऊ बोस्टन (अमेरिका) मध्ये राहतो. तो सध्या आपल्या नातेवाईकांसोबत आरजी बंगल्याच्या प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवतो. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ईशा देओलची मुलगी राध्याचे photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

 

बातम्या आणखी आहेत...